VPK Urban Multipurpose Cooperative Society profit  Dainik Gomantak
गोवा

VPK Multipurpose Society: ‘व्हीपीके’ अर्बनला 28 कोटींचा नफा! 2 नव्या शाखा उघडणार, नवीन उद्योगात प्रवेशाचे सूतोवाच

VPK Urban Multipurpose Society profit: राज्यातील सहकार क्षेत्रात नाव कमावलेल्या व्हीपीके अर्बन मल्टिपर्पझ कोऑपरेटिव्ह सोसायटीला यंदाच्या वर्षी एकूण २८ कोटी ३९ लाख रुपये नफा झाला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: राज्यातील सहकार क्षेत्रात नाव कमावलेल्या व्हीपीके अर्बन मल्टिपर्पझ कोऑपरेटिव्ह सोसायटीला यंदाच्या वर्षी एकूण २८ कोटी ३९ लाख रुपये नफा झाला आहे. मागचे नुकसान वजा करून हा थेट नफा झाल्याचे व्हीपीकेचे अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी व्हीपीकेचे उपाध्यक्ष सूर्यकांत गावडे, संचालक आनंद केरकर, रामा गावडे, हिरू खेडेकर, दिना बांदोडकर, रोहिदास गावडे, हेमंत गावडे, चिराग गावडे, सावित्री वेलिंगकर, सुषमा गावडे तसेच नियुक्त संचालक अशोक गावडे, व्यवस्थापकीय संचालक संतोष केरकर, सरव्यवस्थापक सुरेश गावडे, वरिष्ठ व्यवस्थापक कृष्णा मुरगावकर आदी उपस्थित होते.

व्हीपीकेने गेल्या आर्थिक वर्षी तीन नव्या शाखांचे उद्घाटन केले. त्यामुळे राज्यभरातील व्हीपीकेच्या शाखांची संख्या ३९ झाली आहे. व्हीपीकेचे सध्या १ लाख २६ हजार ३४४ भागधारक असून भागभांडवल ४२.६९ कोटी रुपये आहे. राखीव निधी ५७.८९ कोटी रुपये असून एकूण जमा ६४६.५७ लाख रुपये आहे. कर्ज व उचल ६२७.५८ कोटी रुपये असून एकूण व्यवसाय १२७४.१५ कोटी रुपये आहे. बँकेतर्फे आर्थिक गुंतवणूक आणि जमा रु. २१०.७२ कोटी रुपये असून यंदाचा एनपीए २.७५ पर्यंत खाली आहे, अशी माहिती व्हीपीकेचे अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी तसेच व्यवस्थापकीय संचालक संतोष केरकर यांनी दिली.

व्हीपीकेने गरजवंतांना कर्ज देण्याबरोबरच नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या विविध योजनांद्वारे ग्राहकाला प्रोत्साहन दिले आहे. व्हीपीकेची ही वाटचाल ग्राहक तसेच भागधारक आणि बँकेच्या कर्मचारी तसेच संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच सुरू असून यंदाच्या वर्षी कळंगूट आणि थिवी अशा दोन ठिकाणी नवीन शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नवे ॲप विकसित!

व्हीपीकेने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावले असून ग्राहक आणि भागधारकांच्या पाठिंब्याच्या जोरावर आता व्हीपीके नवीन उद्योग व्यवसायात उतरणार आहे. या व्यवसायासंबंधीची माहिती लवकरच जाहीर करू असे यावेळी सांगण्यात आले. याशिवाय व्हीपीकेतर्फे जनरल, मेडिकल तसेच इतर विमा क्षेत्रात उतरणार आहे. व्हीपीकेने आपल्या बँकिंग क्षेत्रात तत्परता येण्यासाठी नवीन ॲप विकसीत केले असून त्यामुळे ग्राहकाला बँकिंग चांगल्या प्रकारे आणि तत्परतेने करता येईल, अशी माहिती दुर्गादास गावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Nightclub Fire: "भाजप सरकार हाय हाय..." परवाना नसतानाही नाईट क्लब सुरू कसा? विरोधक आक्रमक! VIDEO

Smriti Mandhana: लग्न मोडलं... स्मृती मानधनाने पोस्ट करत लग्नाबाबत स्पष्टचं सांगितलं, पाहा पोस्ट

Shivaji Maharaj Cavalry: राज्याभिषेकानंतर आई जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आग्रहाने कृष्णा घोड्यावर बसवले होते; छत्रपतींचे समृद्ध घोडदळ

Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

SCROLL FOR NEXT