Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane EXCLUSIVE | गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव : विश्वजीत राणे

विरोधी पक्षनेतेही नवीन, त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नसल्याचा विश्वजीत राणेंचा टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील काँग्रेस नेतृत्त्वावर विश्वजीत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. आज आहेत ते उद्या कुठे जाणार हे माहित नाही. जे नेते झाले आहेत त्यांना तीन महिने देखील अजून झालेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची मनःस्थिती चांगली नाही, अशा शब्दात विश्वजीत राणेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देखील नवे आहेत त्यांच्यापाशी कोणतीही विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गोमन्तकला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विश्वजीत राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विश्वजीत राणे यांच्यावर नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. सत्तरीची शान वाघेरी डोंगर कुणी विकला ? तेव्हा मंत्री विश्वजीत राणे कुठे होते ? वाघेरीच्या विध्वंसाचं ध्येय कुणाचं होतं ? या प्रश्नांची विश्वजीत राणेंनी उत्तरं द्यावी. सवयीप्रमाणे विश्वजीत राणे घाईत आणि संभ्रमीत असल्याचा निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी साधला होता. यावर बोलताना विश्वजीत राणेंनी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

दरम्यान मला पक्षाने माझी भूमिका समजावून सांगितली आहे. केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजप पारदर्शक कारभार करत आहे. आपल्यालाही गोव्यात पारदर्शक कारभार करायचा आहे, असं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं भाजपचे नेते जी माझी भूमिका ठरवतात त्यात मी आनंदी आहे. मात्र ज्यांनी भष्ट्राचार केला आहे त्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचंही विश्वजीत यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT