Forest Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa GMC: आता सर्व रुग्णांची ‘ॲंटीजन’ चाचणी : आरोग्यमंत्री

कोविडविरुद्ध प्रशासन सज्ज

दैनिक गोमन्तक डिजिटल

Covid-19 Antigen Test Mandatory in Goa GMC: राज्यातील उपजिल्हा, जिल्हा आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची अँटीजन चाचणी अनिवार्य असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या आरोग्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोरोनासंबंधित मॉक ड्रिल झाले. यावेळी आरोग्यमंत्री राणे, सचिव अरुणकुमार मिश्रा, रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

राणे म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आम्ही आज हे मॉक ड्रिल केले आहे. कोविडची कोणतीही स्थिती हाताळण्यासाठी राज्य प्रशासन तयार असून कोरोनासंबंधीची उपाययोजना यासंबंधीचा आढावा घेण्यात आला. यात रुग्णांसाठी लागणारे कोविड स्वतंत्र कक्ष, खाटांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला.

उपचार कक्ष आणि खाटा वाढविणार

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, राज्यात अत्यावश्यक वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध असून सध्या दोन्हीही रुग्णालयांत स्वतंत्र 30-30 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जर कोरोनाबाधितांची संख्या वाढली आणि अधिकच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले, तर खाटांची संख्या आणि कोविड कक्ष वाढविण्यात येतील. सध्या तशी आवश्यकता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT