Health Review Meeting  Dainik Gomantak
गोवा

Health Review Meeting : चाचण्यांचा वेग वाढवणार : विश्‍वजीत राणे

जिनोम सिक्वेन्सिंग मशीन्स कार्यान्वित करा; गोमेकॉला निर्देश

दैनिक गोमन्तक डिजिटल

देशासह राज्यातही कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व सरकारी इस्पितळांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यासह आवश्‍यकता भासल्यास ‘आरटीपीसीआर’ चाचणीही करण्यात येत आहे.

तसेच गोमेकॉतील वैद्यकीय पथकाला जिनोम सिक्वेन्सिंग मशीनरी कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार, संसर्गाच्या प्रकाराचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील विविध राज्यांमधील कोविड संसर्गाची स्थिती तसेच त्यासाठीची राज्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे उपस्थित होते.

गोव्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणची इस्पितळे तसेच आरोग्य केंद्रांत अँटीजन चाचण्या सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यातील महामारीचा आढावा सादर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळणारे सहकार्य आणि मार्गदर्शन याबाबत राणे यांनी आभार व्यक्त केले.

10, 11 एप्रिलला मॉक ड्रिल

देशभरात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा व त्याची तयारी याबाबत 10 व 11 एप्रिलला मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये आरोग्य खाते सहभागी होणार आहे. 8 व 9 रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

अँटीजनसह गरज पडल्यास रुग्णांची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट

कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी करून त्यांचे पालन करण्याचे आवाहन लोकांना केल्याची माहिती राणे यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिली. याशिवाय या महामारीला सामोरे जाण्यासाठी मागील अनुभवानुसार काही कठोर पावले उचलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT