Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: 'आमचे नेते एकच, प्रमोद सावंत'! राणेंचे प्रतिपादन; दीड कोटी चौ.मी. जागा पूर्वीच रूपांतरित झाल्याचा केला दावा

Vishwajit Rane: भूरूपांतर झाल्याविषयी विरोधकांनी श्वेतपत्रिका मागितली मी पांढऱ्या कागदावर काळा कागद घालून देतो, असे विश्वजीत राणे यांनी विरोधकांच्या मागणीवर उत्तर दिले.

Sameer Panditrao

पणजी: मी नगरनियोजन मंत्री होण्यापूर्वी १६ ोबीनुसार १ कोटी ५० लाख चौ. मी. भूरूपांतर झाले. काँग्रेसचे सरकार असताना ९.५ कोटी चौ. मी. भूरूपांतर झाले. मी कोणाचेही नाव घेत नाही. भूरूपांतर झाल्याविषयी विरोधकांनी श्वेतपत्रिका मागितली मी पांढऱ्या कागदावर काळा कागद घालून देतो, असे विश्वजीत राणे यांनी विरोधकांच्या मागणीवर उत्तर दिले.

माझ्‍या कार्यकाळात १६ ते १७ लाख चौ. मी. भूरूपांतर झाले, असेही ते म्‍हणाले. नगर आणि ग्रामीण नियोजन, नगरपालिका प्रशासन आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय, महिला व बालकल्याण, वन, गोवा दंत महाविद्यालय, अन्न व औषध, आरोग्य सेवा या खात्यांवरील मागण्या व कट मोशनवर उत्तर देताना ते बोलत होते.

सुरुवातीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मडगावातील प्रस्तावित कब्रस्तानचा विषय याच अधिवेशनात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून सोडविला जाईल, असे आश्वासन राणे यांनी दिले.

अत्यावश्यक सेवेविषयी सर्वांनी मते मांडली; परंतु १०८ रुग्णवाहिका सेवेचे जे चांगले काम आहे, त्याविषयी कोणीच बोलत नाही. ही सेवा मी राज्यात सुरू केली. अत्यावश्यक सेवेद्वारे सीएसआरतर्फे रुग्णवाहिका बदलण्याचे काम सुरू आहे. रुग्णवाहिका सेवेवर ताण येतो, यापूर्वी केवळ ३२ रुग्णवाहिका होत्या. आता ती संख्या १०३ पर्यंत पोहोचली आहे.

राणे म्हणाले, की २००८ पासून नवजात शिशु तपासणीअंतर्गत १.१८ लाखांहून अधिक बाळांची तपासणी केली आहे आणि गोमेकॉत १,१५० हून अधिक रुग्णांना अनुवांशिक समुपदेशनाचा फायदा झाला आहे.

बालरोग आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरद्वारे (पीएनआरसी) २०२४ मध्ये लहान मुलांना जी मदत द्यायची असते, ती दिली आहे. त्यात ११,००० हून अधिक मुलांची नोंदणी झाली आणि २२,००० हून अधिक थेरपी सत्रे केली आहेत.

प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. निशित शाह आणि पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या नेतृत्वाखाली गोमेकॉत एंडोस्कोपिक स्कल बेस सर्जरी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे केंद्रे सुरू होतील. त्यामुळे किडनी प्रत्यारोपणास फायदा होणार आहे. १२० खाटांच्या राज्य कर्करोग संस्थेचे बांधकाम आणि गोमेक़ॉत क्रिटिकल केअर, रेस्पिरेटरी केअर आणि ब्लड बँकसाठी नवीन विशेष ब्लॉकची उभारणी होत आहे.

फोंडा आणि म्हापसा येथील सिटीस्कॅन मशीनचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगून राणे म्हणाले, पेडणेच्या कम्युनिटी सेंटरचे ग्रामीण रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्र असे नामकरण केले जाईल. या भागात आरोग्यसेवा पुरवठ्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

डॉ. केदार रायकर यांनी तुये, कुडचडे येथील उपजिल्हा रुग्णालये आणि काणकोण येथील जिल्हा रुग्णालयासाठी एक व्यापक प्रस्ताव देखील तयार केला आहे. डॉक्टर येत आहेत. त्यांच्यासाठी वेतनही वाढविली आहे. गोमेकॉ हे सर्वांत चांगली आरोग्य सेवा देणारे केंद्र असल्याचा उल्लेख राणे यांनी केला.

दोन्ही जिल्हा रुग्णालयांत क्रिटीकेअर सेंटरची निर्मिती केली जाईल, तेथे सर्व सुविधा असतील, असे त्यांनी युरी यांच्या ट्रॉमा सेंटरच्या मागणीवर उत्तर दिले. गोमेकॉत शिस्त कडकपणे पाळली जाईल. आमचे अनेक डॉक्टर प्रशंसनीय काम करत आहेत, तरीही मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध खासगी सराव करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

गोमेकॉत अतिरिक्त ५० एमबीबीएस जागा प्रस्तावित आहेत आणि दक्षिण गोव्यात एक नर्सिंग कॉलेज निर्मिती प्रक्रियेत आहे, जेणेकरून येथील आरोग्यसेवा बळकट होईल. राणे म्हणाले, पणजीमध्ये राबविलेल्या यशस्वी मॉडेलचे अनुसरण करून, आम्ही सर्व नगरपालिकांमध्ये कचरा संकलनासाठी क्यूआर कोड-आधारित ट्रॅकिंग सुरू करत आहोत. महानगरपालिका १६ पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करते. त्यामुळेच सर्वांत स्वच्छ शहराचा किताब मिळवला आहे.

मोफत आयव्हीएफ सेवा देणारे पहिले राज्य

सरकारी रुग्णालयात मोफत आयव्हीएफ सेवा देणारे भारतातील पहिले राज्य असल्याचा गोवा अभिमान बाळगतो. येथे सुरू झालेल्या आयव्हीएफ सेवेमुळे ९ निरोगी बाळे, एक जुळे, एक तिळे अशी मुले जन्माला आली असून याद्वारे अनेक कुटुंबांना आशा दिली आहे. सरकारी डॉक्‍टरना खासगी प्रॅक्‍टिस करण्‍यास मनाई आहे, असेही मंत्री राणे यावेळी म्‍हणाले.

८ ऑगस्ट रोजी गोमेकॉत टाटा ओपीडीचे शिबिर

स्वस्थ महिला स्वस्थ गोवा मोहिमेद्वारे, आम्ही १.५ लाखाहून अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली आहे. त्यापैकी बहुतेक महिला प्रगत आयब्रेस्ट तंत्रज्ञानाचा वापर करतात. कर्करोग अभियान व्हॅनसह आमच्याकडे १८ शिबिरे आहेत.

टाटा ओपीडीचे पुढील शिबिर ८ ऑगस्ट २०२५ रोजी गोमेकॉत येथे आहे, अशी माहिती राणे यांनी दिली. त्यावर विजय सरदेसाई म्हणाले, जर रुग्णालये बरे चालतात तर शिबिरे कशासाठी?

गोवा हे क्युरेएआय आणि अस्तराझेंकासोबत एआय आधारित फुफ्फुसांच्या कर्करोग तपासणी करणारे पहिले राज्य आहे.

अवयवदान उपक्रमात ९ यशस्वी अवयव प्रत्यारोपण झाले आहे. तर डीडीएसएसवाय आणि मेडिक्लेममुळे २२,९०० हून अधिक नागरिकांना फायदा झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रोजेक्ट रकसा पाईपलाईनमध्ये आहे. लवकरच तळागाळापर्यंत आम्ही ऑन्कोलॉजी मोहीम सुरू करणार आहोत.

डिजिटल हेल्थ इंटिग्रेशनमध्ये गोवा अव्वल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यात खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र डिजिटली सक्षम झाले आहे, २०१ आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना केली आहे. ९ लाख ९,८०० आभा कार्ड दिले आहेत. तसेच ४.४ लाख डिजिटल हेल्थ रेकॉर्ड तयार केले गेले, गोवा डिजिटल हेल्थ इंटिग्रेशनमध्ये देशात आघाडीवर आहे.

आमचे नेते एकच, प्रमोद सावंत!

‘इथे एक नंबर दोन नंबर काही नाही. आमचे एकच नेते आहेत ते म्‍हणजे डॉ. प्रमोद सावंत. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली आमचे चांगले काम सुरू आहे’, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT