Amit Patkar And Vishwajit Rane Dainik gomantak
गोवा

Fire In Goa: आगीच्या सर्व घटनांमध्ये विश्वजित राणेंचा हात, अमित पाटकरांचा संशय; म्हणाले त्यांना...

काणकोण येथील चापोली आणि कुंकळ्ळी मतदारसंघातील पारोडा येथे नुकत्याच लागलेल्या आगीबाबत काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Wild Fire Incidents In Goa: काणकोण येथील चापोली आणि कुंकळ्ळी मतदारसंघातील पारोडा येथे नुकत्याच लागलेल्या आगीबाबत काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गोव्यातील वनक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत लागलेल्या आगीच्या सर्व घटनांमध्ये विश्वजित राणेंचा (Vishwajit Rane) हात असल्याचा संशय व्यक्त केलाय.

'मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यातील वनराई व जंगलातील आगीबाबत पूर्ण मौन बाळगले आहे. त्यांच्या कार्यकाळात पर्यावरण-संवेदनशील आणि हरित भूमी का जळत आहेत, याचे उत्तर ते गोमंतकीयांना देतील का?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली 'काँक्रीट जंगल' मंत्री होण्याची त्यांना घाई झालेली दिसते,' असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी वन व नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्यावर केला आहे.

विश्वजित राणे यांनी गोव्याचे वन आणि नगर नियोजन मंत्रीपद स्वीकारल्यानंतरच ही आग भडकली हा योगायोग म्हणता येणार नाही. त्यांच्या भूमिकेची तातडीने चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.

'विश्वजित राणे यांचे मौन जंगल आणि हरित भागात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत त्याचा सहभाग सिद्ध करते. गोव्याचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करून गोव्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ते तयार आहेत', असा आरोप अमित पाटकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT