Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

'झुआरी जमीन घोटाळ्यावर सरकारची करडी नजर'

घोटाळा अन्य खात्यांच्याही कक्षेत असल्याने मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असल्याचं विश्वजीत राणेंचं स्पष्टीकरण

आदित्य जोशी

मडगाव : झुआरी अॅग्रो लिमिटेड कंपनीला झुवारीनगर येथे जी सरकारने दिलेली जागा फॅक्टरी सुरु करण्यासाठी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी देण्यात आली होती. ती जमीन विकायला दिली नव्हती, असं मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे. झुआरी जमीन घोटाळा ही बाब केवळ नगर नियोजन खात्याच्याच कक्षेत नाही तर इतर अनेक खात्यांशीही संबंधित आहे. त्यामुळे आपण त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करु शकत नाही. मात्र सरकार या प्रकरणाची गंभीर दखल घेईल असं मत मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केलं आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी नुकतंच झुआरी जमीन विक्री हा 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे दावा केला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी राणेंना प्रश्न विचारला. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, कायदा हा सर्वांना समान आहे. मग तो मिका सिंग असो किंवा मायकल लोबो असो. कायद्यासमोर सर्व सगळेच सारखे. गोव्यातील वारसा स्थळांचे, समुद्र किनाऱ्यांचे जतन केले जाईल. वारसा स्थळाच्या 100 मीटर आत कोणालाही बांधकाम करता येणार नाही. लोबो यांनी जे कारनामे केले आहेत ते विधानसभेत उघड केले जातील असेही राणे यांनी सांगितले.

सध्या गोव्यात कॉंग्रेसला अस्तित्वच नाही. अमित पाटकर आणि मायकल लोबो यांनी हा पक्ष विकत घेतला आहे. त्यामुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासारखे निष्ठावंत सुद्धा पक्षापासुन अलिप्त राहू पाहात आहेत. कित्येक कॉंग्रेसचे आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आणि उत्सुक आहेत. सत्तेबाहेर जास्त काळ ते राहू शकत नाहीत. मात्र आपण त्यांची नावे जाहीर करणार नाही असेही राणे यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Elections: फातोर्ड्यासह मडगावातील पालिका प्रभागांतही निवडणूक लढवू - विजय सरदेसाई

Marigold Flowers: झेंडू फुलांच्या मागणीत वाढ, लागवडीवर कृषी खात्याचा जोर; 3 वर्षांत 23.77 कोटी फुलांची आयात

Operation Flushout: ऑपरेशन फ्लशआऊट! गोव्यातील हरमल येथून रशियन नागरिकाला अटक

Valpoi: 'बाप्पाला बसवणार कुठे?' वेळूस येथील वृद्धेला मदतीची आस; घर कोसळण्याच्या स्थितीत, मुलाचीही तब्येत बिघडलेली

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

SCROLL FOR NEXT