Latest News On COVID-19 Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन 15 जानेवारीपर्यंत सुरू करणार'

अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना व्हेरियंटची माहिती देणारे जिनोम सिक्वेन्सिंग मशीन 15 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest News On COVID-19)

भाजप (BJP) कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. कोरोना विषाणूचा व्हेरियन्ट आणि डीएनएची माहिती देणारी यंत्रणा गोव्यात नाही. सध्या पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेवर (NIV) अवलंबून राहावे लागते. सध्या राज्याचे हजारो नमुने या प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. म्हणून राज्य सरकारने व्हायरॉलॉजी लॅबची उभारणी केली असून येथे हे मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे.

परराज्यांतील पक्षांकडून दिशाभूल

काही पक्ष बाहेरून येऊन गोव्यातील लोकांना खोटी आश्वासने देत आहेत. त्यांना माहिती आहे की, त्यांचे सरकार गोव्यामध्ये (Goa) येणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात सर्वात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध आहे. केंद्राच्या सहकार्याने अनेक सुविधा व प्रकल्प भाजपने उभारले आहेत.

12 महिन्यांत उभारणार कॅन्सर इस्पितळ

राज्यातील अनेक इस्पितळांत डायलेसिस केंद्र सुरू केल्यामुळे किडनी आजारावर उपचार घेणाऱ्या लोकांना आता गोमेकॉत जावे लागत नाही. बांबोळी येथे 270 कोटी रुपये खर्चून कॅन्सर इस्पितळ उभे राहात आहे. ते 12 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून कॅन्सर उपचारासाठी गोवेकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, असेही राणे यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT