Vishwajeet Rane & Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विश्‍वजीत राणे अन् गुदीन्हो यांची निमंत्रित म्हणून निवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांनी ही नियुक्ती केली असून भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातून ही नियुक्तीची ही यादी जाहिर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे (Goa) आरोग्य व उद्योग मंत्री विश्‍वजीत राणे (Vishwajeet Rane) व वाहतूक व पंचायत मंत्री मावीन गुदीन्हो (Mavin Gudinho) यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांनी ही नियुक्ती केली असून भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातून ही नियुक्तीची ही यादी जाहिर करण्यात आली आहे. विश्‍वजित राणे व मावीन गुदीन्हो यांची पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रिय कार्यकारीणीवर नियुक्ती झाली आहे. केंद्रिय पर्यंटन व जहाज राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Minister of State Shripad Naik) हे भाजपच्या राष्ट्रिय कार्यकारिणीवर अनेक वर्षापासून असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री म्हणून तर माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) हे माजी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या राष्ट्रिय कार्यमाझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

आपण आमदार म्हणून दाबोळी मतदारसंघात व मंत्री म्हणून गोवाभर केलेले काम, भाजपशी राखलेली एकनिष्ठा यामुळे मला जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रिय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. या पुर्वी जीएसटी काऊन्सिलवर गोव्याचे प्रतिनिधीत्व करुन मंत्री गटाच्या समितीवर मी काम करत आहे. यादोन्ही गोष्टीमुळे मला पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्याची जाणीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे पी नड्डा, सरचिटणीस बी एल संतोश, गोव्याचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) व संघटनमंत्री सतिश धोंड यांचा मी आभारी आहे. मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सांवत (Chief Minister Dr. Pramod Samvat) यांच्या नेतृत्वाकाली सरकार चांगले काम करत असून ते काम पुढेही चालूच राहणार आहे.कारिणीवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT