Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा'; महाराष्ट्रासह गोव्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजन

विहिंप व बजरंग दलातर्फे 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

Rajat Sawant

Chhatrapati Shivaji Maharaj Shaurya Jan Jagran Yatra: विश्व हिंदू परिषदेने गोवा आणि महाराष्ट्र राज्यात 'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जन जागरण यात्रा' काढण्याची घोषणा केली आहे.

दोन राज्यातील युवकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टाने 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा बजरंग दलाने या यात्रेचे आयोजन केले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभर शौर्य यात्रा काढण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

तसेच महाराष्ट्र आणि गोव्यात स्थानिक लोकांशी भावनिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदू परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.

“हिंदू समाजाच्या शौर्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही शौर्य जन जागरण यात्रा काढण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष असल्याने त्यांचे नाव यात्रेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणातील यात्रा 30 सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू होऊन 15 ऑक्टोबरला मुंबईत संपेल असे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले.

“हिंदू समाज शूर आणि धाडसी आहे. हिंदूंनी पूर्वी कट्टरतावादी विदेशी हल्ल्यांविरुद्ध लढा दिला. हिंदूंच्या शौर्याला पुन्हा जागृत करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिहादी प्रवृत्तींविरुद्ध लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे त्यांचे नाव आम्ही यात्रेला दिले आहे" असे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT