Vishal Golatkar Murder Case Dainik Gomantak
गोवा

मेरशीतील ‘हिस्ट्रीशीटर' खून प्रकरणात सहावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात; वाळपईत घेत होता पोलीस प्रशिक्षण

वाळपई येथे प्रशिक्षण घेत असलेले पोलीस हवालदार अमेय वळवईकर यांना मेरशीतील विशाल गोतलकरच्या हत्याप्रकरणात सहभाग असल्यामुळे ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

Kavya Powar

Vishal Golatkar Murder Case: मेरशीतील कुख्यात गुंड विशाल गोलतकर (39) याचा शनिवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने खून करून वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकल्याच्या घटनेने राज्य हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह पाच जणांना अटक केली आहे. यातील सहाव्या आरोपीलाही आज (17 जुलै) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाळपई येथे प्रशिक्षण घेत असलेले पोलीस हवालदार अमेय वळवईकर यांना मेरशीतील विशाल गोतलकरच्या हत्याप्रकरणात सहभाग असल्यामुळे ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे.

संपूर्ण प्रकरण असे की....

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशीतील गुंड साई ऊर्फ कोब्रा तुळशीदास खांडेकर (वय 30 वर्षे) आणि विशाल हे दोघे पूर्वी एकाच गुन्हेगारी गटात होते.

नंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. विशाल साईचा तिरस्कार करू लागला. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट वाढत गेले. नंतर साईने विशालचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यासाठी त्याने शनिवारी रात्री व्यवस्थित नियोजन केले आणि मेरशी येथे एका ठिकाणी विशालला बोलावून घेतले. त्यावेळी त्याने आपल्यासोबत ओमकार पांडुरंग च्यारी (१९), गौरेश नारायण गावस (२५) तुषार तुळशीदास कुंडईकर (३८) यांच्यासह एका अल्पवयीनाला सोबत घेऊन विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. विशालचा खून केल्यानंतर त्यांनी तेथून दीड किलोमीटर वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT