Visa
Visa 
गोवा

गोव्यात विदेशी पर्यटकांना विनाव्हिसा मुक्त संचार

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: व्हिसाशिवाय(Visa) विदेशी पर्यटक(foreign tourists) फिरताना आढळले, तर त्यांना अटक होत होती. आता त्यांना 31ऑगस्टपर्यंत मुक्तपणे विनाव्हिसा संचार करण्याचा परवाना मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेल्या कोविड महामारीच्या प्रसारामुळे, विमान सेवा उपलब्ध नसल्याकारणाने मार्चपूर्वी वैध भारतीय व्हिसावर भारतात आलेले अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. अशा परदेशी नागरिकांना टाळेबंदीच्या काळात त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने 29 जून रोजी यासंदर्भात एक आदेश जारी केला. या आदेशानुसार, ज्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा भारतातील निवासासाठीचा पूर्वनिश्चित कालावधी 30 जूननंतर संपत असेल, तर तो आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेल्या दिवसानंतर आणखी 30 दिवसांसाठी वैध आहे असे मानण्यात येईल. (Visa free travel to foreign tourists in Goa till August)

तरीही व्हिसावाढीसाठी विदेशी नागरिक घाबरून अर्ज करत असल्याचे दिसून आल्याने भारतात अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा निवासाचा पूर्वनिश्चित कालावधी आता 31ऑगस्टपर्यंत वैध मानण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारकडून ही मुदतवाढ मोफत केली जाणार असून यासाठी त्या नागरिकांना कोणतेही वाढीव शुल्क किंवा अधिक काळ निवास केल्याबद्दलचा दंड आकारला जाणार नाही. या परदेशी नागरिकांनी व्हिसाच्या मुदतवाढीशी संबंधित परदेशीय नोंदणी कार्यालय अथवा परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालयात कोणताही अर्ज सादर करण्याची गरज नाही.

या नागरिकांना भारत सोडून जाताना परदेशीय नोंदणी कार्यालय अथवा परदेशीय प्रादेशिक नोंदणी कार्यालयात निर्गमन परवानगीसाठी अर्ज करता येतील आणि कोणतेही वाढीव शुल्क किंवा अधिक काळ निवास केल्याबद्दलचा दंड न आकारता त्यांना ही परवानगी मोफत दिली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रणात

राज्यात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या तसेच संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. आजही सतत दुसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्त मृत्यूंची संख्या 17 पर्यंत खाली आली आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाणही 572 असल्याने हा संसर्ग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले आहे. कोरोना संसर्गाचे पाॅझिटिव्हिटी प्रमाणही 14.10 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही परिस्थिती पाहता राज्यात 7 जूनपर्यंत असलेला राज्यस्तरीय संचारबंदी उठविली जाण्याची शक्यता आहे.  

जून महिन्यातील गेल्या चार दिवसांत 78 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2757 जण संक्रमणित झाले होते. या काळात 6343 रुग्ण बरे झाले आहेत, 2400 संसर्ग रुग्णांनी गृह अलगीकरण स्वीकारले आहे, तर 357 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही संख्या बरीच खाली आली आल्याने लोकांनाही काहीअंशी दिलासा मिळाला आहे. विविध प्राथमिक व सामुदायिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील संसर्ग रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. मडगाव, फोंडा, पणजी या भागात हे प्रमाण एकेकाळी 2हजाराच्या बाहेर गेले आहे, ते आटोक्यात आल्याने या भागातील ‘मायक्रो कंटेन्‍मेंट झोन’ही रद्द करण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला यापैकी 11 जणांचा गोमेकॉ इस्पितळात, 3 जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर तिघांचा खासगी इस्पितळात झाले आहे. त्यातील दोघांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT