Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'तीन कोटी घेतल्याचा आरोप सिद्ध करा'; अजय खोलकरांना न्यायालयात खेचणार, वीरेश बोरकरांचा इशारा

Goa Political Controversy: खोलकर यांनी विविध प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून आपण चोडणकर यांच्‍याकडून तीन कोटी घेतल्‍याचा आरोप केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘‘काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांच्‍याकडून तीन कोटी घेतल्‍याचा आरोप करणाऱ्या अजय खोलकर यांनी कायदेशीर नोटीस मिळाल्‍यानंतर आपणच केलेल्‍या आरोपावरून यू–टर्न घेतला आहे, परंतु त्‍यांनी माझी प्रतिमा मलिन करण्‍याचा प्रयत्‍न केला असल्‍याने आम्‍ही त्‍यांच्‍याविरोधात न्‍यायालयात जाणार आहे’’, असे रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजी) राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘‘खोलकर यांनी विविध प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून आपण चोडणकर यांच्‍याकडून तीन कोटी घेतल्‍याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी या नात्‍याने या आरोपांमुळे माझी प्रतिमा मलिन झाली.

त्‍यामुळेच मी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठवून, त्यांनी केलेले आरोप पुराव्‍यांनिशी सिद्ध करण्याचे आव्‍हान दिलेले होते, पण खोलकर यांनी पुरावे सादर करण्याऐवजी, आपण असे आरोप केलेच नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. मी जारी केलेल्‍या कायदेशीर नोटिशीमुळेच त्‍यांनी घुमजाव करण्‍यास सुरुवात केली आहे’’, असे बोरकर म्‍हणाले.

न्यायालयात जाण्याचा निर्णय

‘अजय खोलकर यांच्‍याविरोधात आम्‍ही न्‍यायालयात जाण्‍याचा निर्णय घेतला आहे. स्‍वत: केलेले आरोप ते फेटाळत असले, तरी त्‍या आरोपासंदर्भातील मीडिया फुटेज, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर पुरावे आमच्‍याकडे उपलब्ध आहेत’’, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मिलिंद नाईकांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर पुरावे बाहेर काढणार! संकल्प आमोणकरांचा इशारा

खरी कुजबुज: 'फोकस' निवडणूक

Rishikesh Bus Accident: प्रवाशांचा आक्रोश अन् चक्काचूर बस! ऋषिकेशजवळ 100 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू; क्रेनच्या मदतीनं जखमींना काढलं बाहेर VIDEO

Road Accident: बायणा येथे भीषण अपघात! ट्रिपल सीट दुचाकीची धडक, 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

IFFI Film Festival: इफ्फीत यंदा कोकणी चित्रपटांची मेजवानी! तब्बल 12 सिनेमांचे होणार विशेष प्रदर्शन

SCROLL FOR NEXT