Viresh Borkar Revolutionary Goans  Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : फ्रान्सिस सिल्वेरांच्या भावाने पैसे वाटल्याचा 'आरजी'चा आरोप

रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या आरोपानंतर आगशीत पंचायत निवडणुकीवेळी वातावरण तापले

आदित्य जोशी

Revolutionary Goans : आगशी पंचायत निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर आणि माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने वातावरण बरेच तापले होते. प्रभाग क्र. 2 मधून सिल्वेरा यांचे बंधू बेनी उमेदवार असून, ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप बोरकर यांनी सोशल मीडियाद्वारे केला. तर हे बिनबुडाचे आरोप असल्याचे सांगून सिल्वेरा गटाने ते धुडकावून लावले.

हे प्रकरण काल बुधवारी सकाळी 11 वाजता घडले. जेव्हा बेनी सिल्वेरा यांची एक गाडी आगशी पंचायत घराजवळच्या मतदान केंद्राजवळ पोहोचली, त्यांच्या मागोमाग सिल्वेरा कुटुंबातील आणखी एक गाडी तेथे आली. दोन्ही गाड्यांच्या काचा काळ्या असल्याने त्यातून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आरजी गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आमदार बोरकर यांनी सोशल मीडियावर या दोन्ही वाहनांची छायाचित्रे टाकली. सध्या सोशल मीडियावर सिल्वेरा गटाच्या विरोधात आरजीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘आरजी’चे आमदार बोरकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असून, मतदान केंद्राला उमेदवारांकडून भेट देणे स्वाभाविक आहे. पैसेवाटप केल्याचा आरोप करून ‘आरजी’ बिथरली असल्याचा त्यांनी आरोप केला. सांत आंद्रेतील पंचायतींमध्ये पराभव होणार असल्याची जाणीव त्यांना झाली असल्यानेच लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे, असा आरोप पंचसदस्य ॲलन सिल्वेरा यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT