Margao Crocodile Video Dainik Gomantak
गोवा

Margao Crocodile Video: अन् मडगावच्या रस्त्यावर आली भली मोठ्ठी मगर; गाड्या थांबल्या, कुत्री पळाली, पाहा व्हिडिओ

मडगाव येथील मच्छी मार्केट रस्त्यावर शनिवारी रात्री 10.30 वाजता भली मोठ्ठी मगर आली.

Pramod Yadav

Margao Crocodile Video: गोव्यात अनेकवेळा विविध ठिकाणी मगर रस्त्यावर किंवा शेतात आल्याचे दिसून आले आहे. किनारपट्टी प्रदेश असल्याने अशा घटना वारंवार समोर येतात. अशीच एक घटना शनिवारी रात्री मडगावच्या रस्त्यावर घडली आहे. भली मोठी मगर रस्त्याच्या मधोमध आली अन् रत्यावरील गाड्या जागच्या जागी थांबल्या. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, मडगाव येथील मच्छी मार्केट रस्त्यावर शनिवारी रात्री 10.30 वाजता भली मोठ्ठी मगर आली. मगर रस्त्यावर आल्यामुळे वाहने जागच्या जागी थांबली. त्यानंतर मगर हळूहळू रस्ता ओलांडताना दिसत आहे.

अचानक मगर आल्याने रस्त्याकडेला असलेली कुत्रे देखील दचकले आणि पळून देखील गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, रस्त्याच्या मधोमध मगर आल्याने रस्त्यावरील वाहने जागीच थांबली व त्यांनी मगरला रस्ता पार करण्यासाठी वेळ दिला.

मार्गावर यावेळी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला असून, तो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT