Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Goa Congress: आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी काँग्रेसकडून एकूण चार तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

Goa Congress

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. धेंपे यांनी मतदान केंद्र १५ येथे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, याबाबत प्रसार माध्यमांनी व्हिडिओ देखील प्रसिद्ध केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यासह सिद्धेश नाईक यांच्याविरुद्ध देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिद्धेश नाईक रायबंदर येथील मतदान केंद्राच्या परिसरात Modi Once More 2024 असे लिहलेला टी-शर्ट घालून फिरत होता, हा आचारसंहितेचा भंग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांनी मडकई येथील मतदान केंद्रावरुन पल्लवी धेंपे यांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मतदान केल्यानंतर हातावर लावण्यात येणारी शाई धुतल्यानंतर जात असल्याचा प्रकार पणजीतून समोर आला असून, ही गंभीर बाब असल्याचे म्हणत याप्रकरणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT