Ribandar church Dainik Gomantak
गोवा

Goa Election: रायबंदर चर्चच्या सदस्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग

निर्वाचन अधिकाऱ्यांकडून चौकशीचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी निवडणूक निर्वाचन अधिकारी व उपजिल्हाधिकारी ईशांत सावंत यांनी जुने गोवे पोलिसांना ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी रायबंदर चर्चचे सदस्य असलेल्या डॉमनिक फर्नांडिस यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. रॉड्रिग्ज यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्वरित पावले उचलण्यात आली आहेत.

पणजीचे उमेदवार असलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी डॉमनिक फर्नांडिस यांना चाळीस लाख रुपये रायबंदर येथील मतदारांची मते मिळावी यासाठी दिले होते. फर्नांडिस यांनी मतदारांना मोन्सेरात यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला होता. रायबंदर चर्चमध्ये प्रार्थना कक्ष उभारण्यासाठी चाळीस लाख रुपये मिळाल्याची वस्तुस्थिती डॉमनिक फर्नांडिस यांनी तेथील मतदारांना सांगितली होती. त्याने ही रक्कम चर्च समितीशी किंवा चर्च धर्मगुरूंशी कोणतीही सल्लामसलत न करता हडप केली. अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी त्यांच्या तक्रारीची प्रत आयकर आयुक्त आणि सक्तवसुली संचालनालयालाही पाठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT