Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Asolda Illegal Constructions: ग्रामस्थांकडून असोल्डा पंचायत मंडळ धारेवर; बेकायदा बांधकामांवरील कारवाईस विलंब

Asolda Panchayat: या बांधकामांवर येत्या पंधरा दिवसांत कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन यावेळी दिले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal Constructions

केपे: असोल्डा पंचायत क्षेत्रातील दोन बेकायदा बांधकामे हटविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने देऊनही ती हटविली नसल्याबद्दल ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. यावेळी सरपंच किस्तोड फर्नांडिस यांनी यांनी या बांधकामांवर येत्या पंधरा दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन यावेळी दिले.

असोल्डा पंचायत क्षेत्रात बेकायदा बांधकाम करून त्या ठिकाणी शेड उभारण्यात आली आहे. या शेडमध्ये स्क्रॅप यार्ड थाटण्यात आले आहे. येथील दोन्ही बांधकामे बेकायदा असल्याने ही दोन्ही बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करावी असा आदेश उपजिल्हाधिकारी व सत्र न्यायालयाने दिला आहे, मात्र वर्ष झाले तरी या बांधकामांवर का कारवाई केली नाही, असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.

ज्या जागेवर ही बांधकामे उभारली आहेत ती जागा कोमुनिदादची नसून ती दुसऱ्या जागेवर बांधली आहेत, परंतु येजा करण्यासाठी रस्ता नसल्याने कोमुनिदादच्या जागेतून जात होते. त्यामुळे कोमुनिदादच्या जागेतून जाणारा रस्ता खोदकाम करून अडवला असून कोमुनिदादच्या जागेतून जाण्यास प्रतिबंध केला आहे, असे मुखत्यार संजय राऊत देसाई यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयाचा आदेश असूनही पंचायत ही बेकायदा बांधकामे पाडण्यास पुढाकार का घेत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी शेड उभारली आहे, त्याठिकाणी स्क्रॅप यार्ड थाटण्यात आले असून तिथे थर्मोकोल जाळण्यात येत असल्याने आमच्या शेतीसाठी मारक ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंधरा दिवसांत कारवाई; सरपंच

या बांधकामांना पंचायतीने कोणतेच ना हरकत दाखले दिले नसल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले. ही बांधकामे आम्ही पडणार होतो पण त्यांनी न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणणार असल्याचे सांगितले होते पण गेले सहा महिने ते या आदेशाविरुद्ध स्थगिती आणू न शकल्याने येत्या पंधरा दिवसांत दोन्ही बांधकामे पाडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President Goa Visit: भाजपचं 'यंग ब्रिगेड' मिशन! नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; राजकीय हालचालींना वेग

Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Mangal Gochar 2026: ग्रहांच्या सेनापतीची 'विजया'कडे कूच! मंगळ बदलणार नक्षत्र, 'या' 3 राशींना होणार अफाट धनलाभ; कष्टाचेही होणार चीज

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

SCROLL FOR NEXT