Chorla Ghat Traffic: Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Traffic: संतप्त ग्रामस्थांचा कणकुंबीत रास्ता रोको; चोर्ला घाटात वाहनधारकांचा खोळंबा

महामार्ग प्राधिकरणच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Akshay Nirmale

Chorla Ghat Traffic: वारंवार अर्ज, विनंत्या करून, निवेदने देऊनही चोर्ला घाटातील रस्त्याची दुरूस्ती न केल्याने संतप्त झालेल्या कणकुंबीतील ग्रामस्थांनी सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमध्ये महिलांचा सहभागही मोठा होता.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने तीन दिवसांमध्ये हा रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

तथापि, आज, सोमवारी अचानक करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमुळे चोर्ला घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनधारकांना घाटातच खोळंबून राहावे लागले. गोव्यातून चोर्ला घाटमार्गे बेळगावकडे जाणाऱ्या गाड्या बराच काळ चोर्ला घाटातच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सरकारने दखल न घेतल्याने रास्ता रोको करण्याची वेळ आली आहे. रस्ता चांगला नसल्याने वाहतुकीस वेळ लागतो, आर्थिक नुकसानही होत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशात कुठेही चालणार 'डीडीएसएसवाय'! पहिले डिजिटल आरोग्य राज्य बनण्याचे गोवा सरकारचे लक्ष्य

Goa mining: 'RKB'ला 7 पैकी 3 खाण डंप; आणखी 13 डंपचा पुढील आठवड्यात होणार ई-लिलाव

Bengaluru Accident: बंगळुरुत भीषण दुर्घटना! काम करत असताना 40 फूट उंचीवरुन कोसळला भलामोठा दगड; 9 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Carapur Retaining Wall: मार्ग खुले न झाल्यास कोर्टात येण्याची याचिकाकर्त्यांना मुभा; विकसकाचा दावा हायकोर्टाने घेतला नोंदवून

Viral Video: 'हो' म्हणशील ना? 1454 फूट उंचीवर तरुणाने प्रेयसीला केलं प्रपोज; रोमँटिक क्षणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT