Goa Forward Party | Vijay Sardesai Dainik gomantak
गोवा

Sanquelim-Ponda Municipal Election 2023 : भाजपाचा विजय का झाला? विजय सरदेसाईंनी सांगितलं कारण

साखळी व फोंडा नगरपालिका निकाल तसा महत्त्वाचा नाही : सरदेसाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यात विधानसभा निवडणुका होऊन एक वर्ष आणि दोन महिने झाले आहेत. राज्य सरकारचा हा सुरवातीचा कार्यकाळ आहे. राज्यात भाजप सत्तेत असल्याने साखळी व फोंडा नगरपालिकेत त्यांना फायदा झाला, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

जर सरकारचा शेवटचा कार्यकाळ असता तर निकाल वेगळाच लागला असता, असेही सरदेसाई यांनी पुढे सांगितले. साखळी व फोंडा नगरपालिका निकाल तसा महत्त्वाचा नाही.

स्थानिक प्रश्न घेऊन झालेल्या या दोन्ही शहरांतील नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आपलीसुद्धा या दोन्ही निवडणुकांमध्ये कसलीही भूमिका नव्हती. मी तिथे प्रचाराला किंवा कुणाला भेटायला सुद्धा गेलो नव्हतो, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

रविवारी साखळी व फोडा पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. साखळी पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने पूर्ण बहुमत प्राप्त केले तर फोंडा पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत आमदार रवी नाईक यांच्या नेतृत्वाखालील फोंडा नागरिक समितीचे आठ नगरसेवक निवडून आले. 

दोन बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर एकूण दहा प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व दहाही जागा भरघोस मतांनी जिंकून भाजपने साखळी मतदारसंघातील अधिराज्य सिद्ध केले आहे.

रवी नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आपला करिष्मा कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले असून फोंडा पालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT