Vijay Sardesai promises to give 80% of private sector jobs to Gomantak if  comes to power in Goa
Vijay Sardesai promises to give 80% of private sector jobs to Gomantak if comes to power in Goa 
गोवा

गोव्याची सत्ता मिळाल्यावर खासगी क्षेत्रातील ८० टक्के नोकऱ्या गोमंतकीयांना देण्याचे विजय सरदेसाईंचे आश्वासन

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : गोवा फॉरवर्डचे सरकार सत्तारुढ झाल्यावर सर्व सरकारी नोकऱ्या गोमंतकीयांनाच मिळतील आणि खासगी क्षेत्रातील ८० टक्के नोकऱ्या गोमंतकीयांना कायदा करून दिल्या जातील. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी असे आश्वासन दिले.


सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, रोजगार हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. सरकार रोजगार पुरवण्यात सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याने युवा वर्गात नैराश्य आले आहे. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन अनेकांनी विदेशाचा मार्ग पकडणे पसंत केले आहे. तेथे जाणाऱ्यांनी आपल्या गोव्याविषयी काहीही मत व्यक्त केले की सरकारला ते खुपते. तुम्ही लंडनचेच पहा असे सरकार त्यांना सांगते.


ते पुढे म्हणाले, आज मुख्यमंत्री १० हजार जणांना नोकऱ्या देणार असे जे सांगतात ते तद्दन खोटे आहे. जिल्हा व पालिका निवडणुकीपूर्वी सर्वांची फसवणूक करण्यासाठी चालवलेला हा सरकारी प्रयत्न आहे. हे १० हजार जणांना नोकऱ्या दिल्या असे गृहीत धरले तरी आजची परिस्थिती फार बिकट आहे, असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नवी नोकरभरती कशी करणार, असे करताना पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना आधी सेवेत घ्या, मतांसाठी नवी भरती करू नका. जे काम करत आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT