Vijai Sardesai Slams Goa Government Dainik Gomantak
गोवा

SGPDA: विजय सरदेसाईंनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

SGPDA: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमधील गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांचा प्रश्र्न अजूनही सुटलेला नाही.

दैनिक गोमन्तक

SGPDA: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमधील गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांचा प्रश्र्न अजूनही सुटलेला नाही. एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमधील गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांचा प्रश्र्न अजूनही सुटलेला नाही. त्यांना कंत्राटदार रात्री 9 वा.नंतर मासळी विक्री करू देत नसल्याची तक्रार घेऊन मासळी विक्रेत्या महिला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या घरी गेल्या.

यावेळी सरदेसाई यांनी कंत्राटदाराला बोलावून या गोमंतकीय महिला मासळी विक्रेत्यांना रात्री १० वा.पर्यंत मासळी विक्री करू द्यावी, असे खडसावून सांगितले.

सरदेसाई यांनी सांगितले की, हे घाऊक मासळी मार्केट आपल्या मतदारसंघात आहे व गोमंतकीय पारंपरिक मासळी विक्रेत्यांच्या सदैव पाठिशी असेन. कंत्राटदार परप्रांतीयांना मासळी मार्केटात घेतो. मग गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना का नाही, असा प्रश्र्न सरदेसाई यांनी कंत्राटदाराला विचारला.

परप्रांतीय विक्रेत्यांना घेतले नाही तरी चालेल; पण या गोमंतकीय मासळी विक्रेत्या महिलांवर अन्याय होता कामा नये, असेही सरदेसाई यांनी कंत्राटदाराला बजावले.

या महिला मासळी विक्रेत्यांनी सांगितले की, एरव्ही एसजीपीडीएने आम्हाला रात्री १० वा.पर्यंत येथे बसण्याची मुभा दिली होती. पण कंत्राटदार आम्हाला ९ वा.नंतर बसायला देत नाही. म्हणून आम्ही सरदेसाई यांची भेट घेतली. यापूर्वी त्याने आम्हाला पुष्कळ मदत केली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT