Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

एसटीना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार : विजय सरदेसाई

राष्ट्रीय स्तरावर एसटीना न्याय देण्यास पुढे सरलेल्या भाजपने गोव्यातही तो द्यावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यातील एसटीना राजकीय आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून राष्ट्रीय स्तरावर एसटीना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने गोव्यातील एसटीना आरक्षण न देता अन्याय केला आहे तो दूर करावा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज केली.

एसटीना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी चळवळ सुरू केलेल्या 'मिशन रिजर्वेशन'च्या पदाधिकाऱ्यांनी आज सरदेसाई यांची गोयंकार घरात सरदेसाई यांची भेट घेऊन या विषयी त्यांनी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी केली. यावर आपण विधानसभेत हा प्रश्न अवश्य मांडू असे त्यांनी सांगितले.

यावेळी मिशन रिझर्वेशनचे निमंत्रक जॉन फेर्नांडिस यांनी गोव्यात गावडा, कुणबी व वेळीप या तीन जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून 20 वर्षे उलटली तरी या समाजांना गोव्यात राजकीय आरक्षण न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची वेळ आता आली आहे असे सांगितले.

एसटी समाजाचे नेते आणि राशोलचे माजी सरपंच जोसेफ व्हाझ यांनी सरदेसाई यानी हा विषय प्रभावीपणे विधानसभेत मांडावा आणि सभापती तवडकर यांनी या चर्चेस वाव द्यावा अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT