Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : मडगाव नगराध्यक्षपदासाठी सरकारकडून रडीचा डाव

मतदान खुले होण्यासाठी वटहुकूमाची तयारी; विजय सरदेसाईंचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : येथील नगराध्यक्षपदाचे मतदान गुप्त घेण्याऐवजी हात वर करून व्हावे, यासाठी सरकार वटहुकूम जारी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार केलेला मसुदा प्रसारित (बाय सर्क्यूलेशन) पद्धतीने संमत करण्यासाठी रात्रीच सर्व मंत्र्यांच्या घरी पाठवून देण्यात आल्याचा असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

सरदेसाई म्हणाले, की नगरपालिका कायद्याप्रमाणे नगराध्यक्षपद निवड हे गुप्त मतदानाने करणे अनिवार्य आहे. याच पद्धतीने घनःश्याम शिरोडकर विजयी झाले होते. अविश्‍वास ठरावानंतर पुढील आठवड्यात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळेसही भाजपसह कामत गटाला धोका आहे. त्यामुळेच या वटहुकूमाद्वारे सरकार कायदाच बदलू पाहत आहे. वास्तविक असे वटहुकूम मंत्रिमंडळाची बैठक घेऊन संमत करायचे असतात. पण सरकारकडे त्याला वेळ नसल्याने बाय सर्क्यूलेशन (मसूदा घरी पाठवून) सरकार ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करू पाहत आहे.

या वटहुकूमाबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, तो काढलेला असू शकतो. मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठीचा मसुदा ‘सर्क्युलेशन’साठी घरी पाठवलेला असेल तर त्याबाबत कल्पना नाही. मी रात्री उशिरापर्यंत बाहेरच होतो. मी अद्याप कोणत्याच मसुद्यावर सही केलेली नाही, अशी माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.

तर मला वाटते, सरकार असे काही तरी करत असावे. कारण नगरपालिका कायद्यात नगराध्यक्ष निवडीचे मतदान गुप्त पद्धतीने घ्यावे, असे कुठेही नमूद नाही. अशी परिस्थिती उद्भल्यास विशेष बैठक बोलावून नगराध्यक्ष निवडावा एवढेच सांगितलेले आहे. असं दिगंबर कामत म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT