vijai sardesai criticizes goa government pop ganesh Idols Dainik Gomatak
गोवा

'पीओपी गणेश मूर्ती रोखण्यात सरकार अपयशी', सरदेसाई बरसले; विसर्जित मूर्ती किनाऱ्यावर आल्या वाहून

Vijai Sardesai Criticizes Goa government: गोव्यात पीओपीच्‍या गणेशमूर्तींच्या आयातीपासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल गोवा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Manish Jadhav

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका घणाघाती वक्तव्यात गोव्यात पीओपीच्‍या गणेशमूर्तींच्या आयातीपासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल गोवा सरकारवर जोरदार टीका केली आहे. गणेश विसर्जनानंतर कित्‍येक ठिकाणी पीओपीच्‍या मूर्ती समुद्र आणि नदीच्‍या काठावर येऊन पडल्‍या आहेत. हे चित्र विदारक असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

सरदेसाई म्हणाले की, ‘‘मी यापूर्वी इशारा दिला होता. त्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘पुरेशी दक्षता’ घेण्‍याबरोबरच ‘कठोर कारवाई'चे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पोकळ होते हे आता सिद्ध झाले आहे,’’ सरदेज़साई पुढे म्हणाले की, "माझ्या सारखे अनेक देवाचा अभिमान बाळगणार्‍या गोयंकारांना किनार्‍यावर गणेशमूर्ती वाहून आल्याचे अत्यंत दुःखदायक असे दृश्य पाहून वाईट वाटले आहे. हे सरकारच्या घोर निष्काळजीपणाचे आणि गोव्याच्या (Goa) हितासाठी कार्य करण्यास असमर्थतेचे हे स्पष्ट प्रतिबिंब आहे."

सरदेसाई यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता, जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गणेश चतुर्थीच्यावेळी पीओपी मूर्ती बाजारात आणण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त करुन त्‍यासंदर्भात सावधगिरी बाळगण्‍याचे आणि कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्‍यानंतर सरकारने (Government) तशी कृती करण्‍याचे आश्वासन दिले होते. पण आताही ही परिस्थिती पाहून ही पीओपी मूर्तींची आयात रोखण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत हे स्‍पष्‍ट झाले आहे.

सरदेसाई पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही आणि त्यांची कृती नेहमीसारखीच चांगल्यापेक्षा अधिक नुकसान करते. हे केवळ पर्यावरणाच्या हानीबद्दल नाही-हे गणेश चतुर्थी भक्तीभावाने साजरी करणाऱ्या हजारो गोंयकारांच्या धार्मिक श्रद्धा आणि भावनांचा अनादर करण्याबद्दल आहे. वारंवार इशारा देऊनही, गोव्यात आयात केलेल्या पीओपी मूर्तींना परवानगी देणे हे आमची परंपरा आणि श्रद्धेचा अपमान आहे."

सरदेसाई यांनी उत्तरदायित्वाच्या गरजेवर भर दिला आणि गोव्याच्या धार्मिक रीतिरिवाजांचा आणखी अनादर रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची विनंती केली. त्यासाठी राज्‍याच्‍या सीमांवर कठोर नियंत्रणे आणण्‍याबरोबरच आणि स्थानिक पातळीवर बनवलेल्या मातीच्या मूर्तींसाठी अधिक प्रोत्‍साहन देण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला, ज्या पर्यावरणास अनुकूल आणि गोव्याच्या परंपरेनुसार आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अध्यक्षांनी हा मुद्दा उचलून धरण्याची आणि या अपयशासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Sourav Ganguly Head Coach: 'दादा' इन अ न्यू रोल! सौरव गांगुली बनला मुख्य प्रशिक्षक, 'या' संघाची जबाबदारी स्वीकारली

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT