Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'शत्रू चित्रपटातच नव्हे, विधानसभेतही झोपतात'! सरदेसाईंचा टोला; कुणाची ॲलर्जी नसल्याचा केला दावा

Vijai Sardesai: दामू जो विरोध करीत आहेत, त्‍यातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ‘व्‍होटबँक’ तयार करीत असल्‍याचे दिसून येते, अशी टीकाही सरदेसाई यांनी केली.

Sameer Panditrao

पणजी: मला कुणाचीही ‘ॲलर्जी’ नाही. त्‍यामुळे विधानसभेच्‍या येत्‍या पावसाळी अधिवेशनात ‘एकला चलो’ भूमिका नसेल असे म्‍हणतच, शत्रू केवळ चित्रपटातच नाही, तर विधानसभा सभागृहातही झोपतात, असा टोला आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी कुणाचेही नाव न घेता लगावला.

विधानसभा अधिवेशन अवघ्‍या दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) या पक्षांमधील दुफळी विविध माध्‍यमांतून वारंवार दिसून येत आहे.

अशा स्‍थितीत विरोधी आमदार म्‍हणून तुम्‍ही विरोधकांना साथ देणार, की ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांच्‍याप्रमाणे ‘एकला चलो’ भूमिका घेणार, असा प्रश्‍न शनिवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सरदेसाई यांना विचारला. त्‍यावर त्‍यांनी प्रथम सावध भूमिका घेतली. मला कुणाचीही ॲलर्जी नाही.

दामूंच्‍या वक्तव्‍यातून व्‍होट बँकेचे राजकारण

कॅब ॲग्रिगेटर धोरणासह सरकारच्‍या इतर काही निर्णयांना खुद्द भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईकच आक्षेप घेत आहेत. यातून प्रशासन कोलमडल्‍याचे दिसून येत आहे. सरकार घेत असलेल्‍या काही निर्णयांना दामू जो विरोध करीत आहेत, त्‍यातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ‘व्‍होटबँक’ तयार करीत असल्‍याचे दिसून येते, अशी टीकाही सरदेसाई यांनी केली.

सभापती तवडकरांच्‍या मतदारसंघातही समस्या!

सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्‍न सभापती असल्‍यामुळे मांडता येत नाहीत. पण, त्‍यांच्‍या मतदारसंघातून माझ्याकडे अनेक प्रश्‍न आले आहेत. त्‍यामुळे यावेळी सभापतींच्‍या मतदारसंघातील प्रश्‍नही सभागृहात मांडू. त्‍यांचीही मला ॲलर्जी नाही, असे सरदेसाई यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

SCROLL FOR NEXT