Kala Academy Goa Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Goa : कला अकादमीचे काम अनुभव नसलेल्या कंपनीला दिल्याचा आरोप

न्यायालयात छायाचित्रे सादर करणार असल्याचं विजय सरदेसाई यांचं स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Goa : कला अकादमी नूतनीकरण कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांनी केली असतानाच हे प्रकरण न्यायालयात नेणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आणखी एक बॉम्ब टाकला. ज्या कंपनीला कुठलीही निविदा न काढता हे काम दिले, त्या कंपनीने यापूर्वी असा एकही प्रकल्प पूर्ण केलेला नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सगळीच माहिती मी देऊ शकत नाही. मात्र, त्या कंपनीने यापूर्वी असा प्रकल्प बांधला आहे, असा दावा केला. त्यामुळे हे काम या कंपनीला दिल्याचे म्हटले आहे. परंतु तो प्रकल्प अजून अस्तित्वातच आलेला नाही, असा घणाघाती आरोप सरदेसाई यांनी केला. आम्ही त्या निर्देशित जागेवर जाऊन छायाचित्रे काढली असून ती पुरावा म्हणून न्यायालयाला सादर करू, असे सरदेसाई यांनी सांगितले.

नीलेश काब्राल यांच्या उत्तरातून गावडेंची पोलखोल

कुठलेही प्रकरण आमच्या पक्षाने हाती घेतले की, त्याचा आम्ही पूर्ण पाठपुरावा करतो. गोव्यात आधुनिक शहाजहानने बांधलेल्या या ताजमहाल प्रकरणाचाही पाठपुरावा करू. हे काम आपण नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते, असे गावडे यांनी म्हटले होते. मात्र, साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी, हे काम देण्यात आपल्या खात्याचा काहीच सहभाग नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. काब्राल यांच्या उत्तरातून गावडे यांची पोलखोल झाली आहे, असे सरदेसाई म्हणाले.

न्यायालयात आम्ही मंत्री गोविंद गावडे यांचे पितळ उघडे करू. कला अकादमी संकुलात जे बदल केले आहेत ते योग्य आहेत का? या कामात भ्रष्टाचार झाला आहे का? जर झाला असेल तर त्याचा मलिदा कुणाला पोहोचला? या सर्व प्रश्नांची उत्तरे गोवेकरांना मिळायला हवीत आणि आम्ही ती देऊ असं आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT