very existence of the Galgibaga coast is in danger government system failed  Dainik Gomantak
गोवा

गालजीबाग किनाऱ्याचे अस्‍तित्‍वच धोक्‍यात; सरकारी यंत्रणा अपयशी

घरांना निर्माण होऊ शकतो धोका, उपाययोजना करण्‍यास सरकारी यंत्रणा अपयशी

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणमधील गालजीबाग व आगोंद समुद्रकिनारा सागरी कासवांच्या संवर्धनासाठी आरक्षित करण्यात आला आला आहे. गालजीबाग किनाऱ्यावर वन खात्यातर्फे सेमी पर्मनंट सागरी कासव (Tortoise) इंटरप्रिटेशन केंद्र उभारण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

केंद्र सरकारच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे वन खात्याचे अनिकेत गावकर यांनी सांगितले. दरम्‍यान, गालजीबाग किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज असून ती रोखण्यासाठी अद्याप उपाययोजना करण्‍यात आली नसल्‍याने नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

पैंगीण पंचायतीच्या (Panchayat) जैवविविधता समितीच्या बैठकीत या किनाऱ्याची झीज रोखण्यासाठी वन खात्याने त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य जैवविविधता मंडळाला कळवण्यात आले असल्याचे पैंगीण जैवविविधता समितीचे अध्यक्ष सुभाष महाले यांनी सांगितले. तर, याबाबत वन खात्याने पैंगीण पंचायत किंवा पंचायत जैवविविधता समितीला विश्वासात घेतले नाही, असे सरपंच (Sarpanch) जगदीश गावकर यांनी सांगितले.

घरांना निर्माण होऊ शकतो धोका

गेल्‍या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गालजीबाग किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज होऊन तेथील सुमारे शंभरेक सुरूच्या झाडांची पडझड झाली होती. समुद्राचे (sea) पाणी सुमारे पंचवीस मीटर आत शिरले होते. त्यामुळे वाळूचा दांडा पट्टा नष्ट झाला आहे. साहजिकच सुरुच्या झाडांची पडझड झाली असून वाळू घट्ट धरून ठेवणाऱ्या वनस्पती नष्ट झाल्या आहेत. गालजीबाग नदीने आपले मुख बदलले आहे. मुखाकडील वाळूचा पट्टा वाहून गेला आहे. या एकंदर प्रक्रियेमुळे किनाराच धोक्यात आला आहे. गालजीबाग नदीच्या किनाऱ्यालगत लोकांची घरे आहेत. किनाऱ्याची झीज अशीच सुरू राहिल्‍यास या धोका निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT