Accident near Ravanaphond Margao military camp Goa Dainik Gomantak
गोवा

मडगावातील मिलिटरी कॅम्पजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

रावणफोंड-मडगाव येथील मिलिटरी कॅम्पजवळ आज सकाळी 8.30 वाजता झालेल्या अपघातात वेर्नोन फर्नांडिस (49, सुरावली) याचे निधन झाले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: रावणफोंड-मडगाव येथील मिलिटरी कॅम्पजवळ आज सकाळी 8.30 वाजता झालेल्या अपघातात वेर्नोन फर्नांडिस (49, सुरावली) याचे निधन झाले. या अपघातात वेर्नोनच्या पत्नी, भाऊ व मुलाला किरकोळ मार लागला असून त्याच्यावर हॉस्पिसिओ इस्पितळात उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. (Vernon Fernandes dies in accident near Ravanaphond Margao military camp)

मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 8.30 वाजता घडली. वेर्नोन हा चारचाकीने कुटुंबियासोबत मडगावच्या दिशेने जात होता. रावणफोंड येथील मिलिटरी कॅम्पजवळ पोहचल्यावर गतीरोधकावर चारचाकी जोराने आपटून वेर्नोनचा चारचाकीवरील नियंत्रण गेल्याने चारचाकी समोरील वीज खांबला धडकली आणि नंतर बाजूला असलेल्या रिक्षा, तीन दुचाकी, टी स्टॉल आणि स्वीट मार्टला चारचाकीने ठोकर दिली.

पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून वेर्नोन याला त्वरित हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात वेर्नोनच्या पत्नी वेनिया फर्नांडिस, भाऊ डेन्वर फर्नांडिस व मुलाला किरकोळ मार लागला असून त्याच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. वेर्नोन हा खलाशी असून तो मुळचा सांजुझे आरियल येथील रहिवासी आहे. वेर्नोन याला अंतर्गत मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT