Suchana Seth CEO Dainik Gomantak
गोवा

Suchana Seth: सूचनाकडून असहकार्य; 12 जणांच्या जबान्या नोंद

Suchana Seth: चिन्‍मयवर पित्याकडून अंत्‍यसंस्‍कार

दैनिक गोमन्तक

Suchana Seth: बंगळुरूमधील ‘माईंडफूल एआय लॅब’ या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनीची सीईओ सूचना सेठ (३९) हिने आपला चार वर्षीय मुलगा चिन्मयची निर्दयी हत्या केली होती. चिन्मयच्या पार्थिवावर बुधवारी (ता.१०) सकाळी बंगळुरूमधील हरिश्चंद्र घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूचना ही पोलिसांना चौकशीत साह्य करत नसून, तिला बांबोळी ‘आयपीएचबी’मध्‍ये तपासणीसाठी नेण्‍यात आले होते. दरम्‍यान, ज्‍या हॉटेलमध्‍ये सूचना राहिली होती, तेथे कफ सिरपच्या बाटल्या आढळल्या. सूचना हिने मुलाला ठार मारण्याआधी कफ सिरप पाजले असावे, असा कयास व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

कफ सिरपमुळे थोडी गुंगी येते. त्यानंतर उशीच्या सहाय्याने मुलाची हत्या केली असावी, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. सध्या मुलाचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांच्या जबान्या नोंद केल्या आहेत.

  • कफ सीरप पाजून गुंगी आल्‍यावर चिमुकल्‍याचा बळी घेतल्‍याचा कयास

  • आयपीएचबीमध्‍ये सूचनाची तपासणी; व्हिसेरा पोलिसांनी तूर्त ठेवला राखून.

संबंध होते ताणलेले

सूचना व पती वेंकटरामन घटस्फोटाच्या प्रक्रियेच्या मध्यभागी होते. तसेच सूचना हिने वेंकटरामन यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT