Canara Bank loan Dainik Gomantak
गोवा

व्यंकटेश प्रभू मोनी यांचे पणजीतील कार्यालय जप्‍त

कॅनरा बँकेची कारवाई: 4.57 कोटींचे कर्ज थकविले

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (गोवा रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी) दणक्यानंतर प्रभू कन्स्ट्रक्शन्सचे मालक व्यंकटेश प्रभू-मोनी यांना कॅनरा बॅंकेकडूनही मोठा दणका देण्यात आला आहे. पाटो प्लाझा-पणजी येथील धेंपो ट्रेड सेंटरमधील प्रभू कन्स्ट्रक्शन्सचे कार्यालय बॅंकेकडून जप्त करण्यात आले आहे.

बॅंकेकडून वारंवार नॉटिसा जारी करूनही प्रभू-मोनी यांनी 4.57 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. बॅंकेकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, कर्जदार आणि कोणत्याही अन्य व्यक्तीने त्या स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कोणताही व्यवहार केल्यास कॅनरा बॅंकेच्या कारवाईस पात्र ठरणार असून, 7.70 कोटी रुपये देणे लागणार आहे. दरम्‍यान, प्रभू मोनी यानी काही वर्षापूर्वी पर्वरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढविली होती.

यापूर्वीही झाली होती कारवाई

गोवा स्थावर संपदा नियामक प्राधिकरण न्यायालयाकडून व्यंकटेश प्रभू-मोनी या बिल्डरला 17 मार्च 2022 रोजी तब्बल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच आंगड-म्हापसा येथील प्रभू चेंबर इमारतीच्या ग्राहकांना तसेच सदनधारकांना प्रतिवार्षिक 9.30% दराने व्याज देण्याचे निर्देश दिले हाेते. एकूण रक्कम 3.50 कोटी रुपये असून, 60 दिवसांच्या आत तो प्रकल्प नळ, वीज आणि सांडपाणी जोडणीसह पूर्ण करून सदनधारकांकडे ताबा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT