traditional matoli items In Goa Markets For Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीचा उच्चांक; कोट्यवधींची उलाढाल

सजावट साहित्य, फुलांच्या दरात मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

Traditional Matoli Items In Goa Markets For Ganesh Chaturthi 2023: राज्यात चतुर्थीच्या पूर्वसंध्येला माटोळी साहित्य, घरगुती वस्तु, विद्युत साहित्य, कपडे, भुसारी सामान, आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली असून राज्यातील सर्व बाजार आज फुलले होते. राज्यात उच्चांकी खरेदी झाल्याने आज कोट्यवधींची उलाढाल झाली.

राज्यात सर्वच साहित्याच्या दरात खासकरून फुले, फळे, मिठाई, सजावट तसेच माटोळी साहित्याच्या दरात मागील वर्षांच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची वाढ झाल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त होत आहेत.

पणजी बाजारात माटोळीसाठी लागणाऱ्या कांगल्या, घागऱ्या, विविध प्रकारची रानटी फळे, तसेच केळीचे घड, नारळाची शेल, दोडगी, भोपळा, तसेच केळीची पाने, माटोळी बांधण्यासाठी लागणारे वेल, सुपारी आदींना बाजार फुलला होता.

फळे-फुले महागली

चतुर्थी दरम्यान बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी फुले महागली आहेत. बाप्पासाठी लागणारे फुलांचे हार १०० पासून ३५० रूपयांपर्यंत व त्याहून अधिक दरात विकले जात आहेत. पुढील आठवडाभर फुलांचे दर चढेच राहणार असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.

बागायदार, मॉल हाऊसफुल्ल !

चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने राज्यातील मॉल, बागायददार, सहकार भांडार तसेच इतर आस्थापने खरेदीसाठी हाऊसफुल्ल झाली होती. विविध मॉल मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर जाहीर करण्यात आल्याने मॉलमध्ये खरेदीला नागरिक अधिक पसंती देताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT