Velsao Dainik Gomantak
गोवा

Velsao News: रेल्वे दुपदरीकरण पाहणीला नागरिकांनी केला विरोध

गोयचो एकवोट सदस्य अन् ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला विरोध

दैनिक गोमन्तक

वास्को: वेलसाव येथे रेल्वे अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा छुप्या मार्गाने घुसखोरी करून रेल्वे दुपदरी करण्याच्या कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न गोयचो एकवोटच्या सदस्यांनी आणि स्थानिकांनी हाणून पाडला. वेलसांव येथे आलेल्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी हाकलून लावले.

(Citizens protest against railway derailment inspection at Velsao)

आर वी एन एल रेल्वेचे वरिष्ठ कर्मचारी तसेच अधिकारी आज वेलसाव येथे येऊन रेल्वे दुपदरी कामाचा नकाशा काढून आढावा घेत असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांना सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोयचो एकवोटचे सदस्य त्या ठिकाणी धावून आले. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना खाजगी मालमत्तेमध्ये घुसल्याची जाब विचारली असता ते निरुत्तर झाले व ते चालत राहिले.

नागरिकांनी विचारला जाब

त्यांना गोयचो एकवोटच्या सदस्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग केला व गाठले. यावेळी त्यांनी गाडीत बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थांनी गाडी रोखून धरली व त्यांना बरेच धारेवर धरले. रेल्वेच्या अशा प्रक्षोभक कृती गावकऱ्यांकडून खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला.

यापूर्वीही कित्येक वेळा रेल्वेने रात्रीच्या वेळीही छुप्या मार्गाने रेल्वे दुपदरी काम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी जागरूक ग्रामस्थांनी तसेच गोयचो एकवोट संघटनेने, जे आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे संरक्षण करतात, तसेच कोळसा विरोधात लढा देतात, त्यांनी रेल्वेचे डावपेच आणून पाडले होते.

दरम्यान पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे की स्थानिकांनी आपला राग मतपत्रिकेद्वारे कसा व्यक्त केला आहे. गोयचो एकवोट आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे डझनभर सदस्य पंचायतीमध्ये निवडून आले आहे. असे असूनही एक संवेदनाशून्य प्रशासन गोवा राज्यातील सर्वात नयनरम्य क्षेत्रामधून एक अत्यंत विनाशकारी मेगा प्रकल्प पुढे ढकलत आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेचा, पर्यटन, नारळ शेती, भात शेती आणि मासेमारी यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे जे सर्व बंद होईल. दरम्यान रेल्वेच्या आजच्या कृतीबद्दल गोयचो एकवोट संघटना व व्यवसाय ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेने पुन्हा गावात पाय ठेवल्यास त्याचे रेल्वेला परिणाम भोगावे लागणार असा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT