Vegetables Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Vegetables Price In Goa: चतुर्थीच्या तोंडावर भाज्‍या महागणार!

Vegetables in Goa: सध्‍या दर स्‍थिर : उत्‍सव काळात असते मोठी मागणी; डिचोली बाजारात गर्दी

दैनिक गोमन्तक

Vegetables Price In Goa: राज्याबाहेरून येणाऱ्या भाज्यांचे दर स्थिर झाले असले तरी चतुर्थीच्या तोंडावर ते कडाडण्याची शक्यता आहे. तसे संकेत येथील आठवडी बाजारातील भाजीविक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

कारण कोणतेही असो, मात्र चतुर्थीच्‍या काळात भाज्यांना प्रचंड मागणी असल्याने विक्रेते या संधीचा फायदा घेण्याची शक्यता आहेच.

गणेश चतुर्थी हा राज्‍यातील सर्वांत मोठा सण. या काळात भाज्यांना प्रचंड मागणी असते. साहजिकच भाज्यांचे दर वाढू शकतात, असा अंदाज भाजीविक्रेते रमेश रेड्डी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सध्या भाज्या स्वस्त झाल्याने महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

भाज्या झाल्या स्वस्त

गेल्या महिन्यापासून डिचोलीत कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढत आहे. आज बुधवारी आठवडी बाजारात तर डिचोलीत प्रचंड प्रमाणात भाज्यांची आवक झाली होती. त्‍यामुळे दरही खाली आले होते.

आज कांदे ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये तर बटाटे ३० रुपये किलो या दराने विकण्यात येत होते. ६० ते ८० रुपये किलो वालपापडी आणि चिटकीमिटकीचे दर होते. अन्य भाज्याही स्वस्त झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT