Vegetable Supply in Goa  Dainik Gomantak
गोवा

तीन भाजी पुरवठादारांचा परवाना अखेर निलंबित

निकृष्ट दर्जाप्रकरणी फलोत्पादन महामंडळाची कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्याच्या फलोत्पादन महामंडळाच्या गाळेधारकांना पुरवठा होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भाज्यांची गंभीर दखल घेऊन सरकारने बेळगावच्या तीन भाजी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांचा परवाना रद्द केला आहे. तसेच भाज्यांची तपासणी करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने कंत्राटदारांशी असलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विधानसभेत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्याला पुरवठा करणाऱ्या कोणा कंत्राटदाराचा परवाना निलंबित केला आहे असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर मंत्री रवी नाईक यांनी उत्तर देताना भाज्यांच्या निकृष्ट''दर्जाबाबत सरकार गंभीर आहे. बेळगावातील मे. विनी एंटररप्रायझेस (मनोहर तशिलदार), मे. सौरभ कोल्ड स्टोरेज (ओमकार गोडबोले) व मे. समर्थ ट्रेडिंग कंपनी (प्रदीप गौंडळकर) यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या तिघांकडे महामंडळाच्या गोव्यातील सुमारे 100 भाजी विक्रेत्यांना पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र बेळगाव खरेदी करण्यात आलेली व पुरवठा केलेल्या भाजीमध्ये बराच फरक असल्याचे आढळून आल्याने व तक्रारी आल्याने ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

फलोत्पादन महामंडळाचे सुमारे 1200 हून अधिक सरकारी व खासगी भाजी विक्रेते आहेत. महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद शेट यांनी हल्लीच उत्तर व दक्षिण गोवा भाजी विक्रेत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी निकृष्ट दर्जाची व वेळेवर भाजी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेण्यात आली.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत केलेल्या अचानक तपासणीत या तीन पुरवठादारांकडून होणाऱ्या भाजीचा पर्दाफाश झाला होता. महामंडळाच्या विक्रेत्यांपर्यंत पोहचणारी भाजी उत्कृष्ट दर्जाची असावी, याची खातरजमा करण्याची जबाबदारी मार्केटिंग पर्यवेक्षकावर ठेवण्यात आली आहे. या भाजीवर व त्याच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक व्हॉटस्अॅप ग्रुप करण्यात आला असून त्यामध्ये अध्यक्षांसह, व्यवस्थापकीय संचालक व सदस्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे ज्या मार्गाने भाजीचा पुरवठा केला जातो त्याचे छायाचित्र या ग्रुपवर दरदिवशी कर्मचाऱ्यांना टाकावे लागत असल्याने कामात पारदर्शकता आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

SCROLL FOR NEXT