Vegetables Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rates: टोमॅटोने गाठली शंभरी! नवरात्रोत्‍सवात भाज्‍यांचे दर कडाडले; दसऱ्यापर्यंत भाव चढेच राहणार

Goa Vegetables Price: भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक महागाईच्या भडक्यात होरपळू लागला आहे. कांदा आणि टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vegetable Rates In Goa Market

पणजी: राज्यात मागील महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक महागाईच्या भडक्यात होरपळू लागला आहे. कांदा आणि टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टोमॅटोने तर तब्बल शंभरी गाठली आहे.

बाजारात टोमॅटोच्‍या दर १०० रुपयांवर पोहोचला असला तरी फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर ८१ रुपये किलो दराने त्‍याची विक्री केली जात आहे. कांदा ७० रुपये किलो दराने विकला जातोय. राज्‍यात नवरात्रोत्‍सवानिमित्त भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. दसऱ्यापर्यंत कांद्या-टोमॅटोचे दर चढेच राहण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करत आहेत.

राज्यात भाजीपाला बेळगावहून आयात केला जात असल्याने विक्रेत्यांचा वाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे तुटपुंजा पगार असणाऱ्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.

कणगी दाखल; दर २०० रुपये किलो

बाजारात चिबूड, काकडी, दोडकी, भोपळा तसेच इतर भाज्या येऊ लागल्‍या आहेत. मध्यम आकाराचा चिबूड १०० ते १२० रुपयांना तर मध्यम आकाराची काकडी ५० ते ६० रुपये दराने विकली जात आहे. कणगी देखील बाजारात दाखल झाली असून २०० रुपये प्रतिकिलो भाव आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने स्थानिक भाज्यांची मागणी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT