Vegetable prices rise in Goa also Fruits too unaffordable  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजीचे दर वाढले: फळेही परवडेनात!

गृहिणींचे बजेट कोलमडले: कांदा, बटाटा, टोमॅटोचे दर मात्र स्‍थिर

दैनिक गोमन्तक

पणजी: महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. इंधनानंतर दूध दरातही वाढ झाली. हे कमी की काय, म्हणून आता दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक असलेला भाजीपाला महागला आहे. यामुळे गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे.

त्यातल्या त्यात कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात लिंबू 50 रुपयांना आठ मिळायचे. मात्र, आज लिंबूच्या दरात काही प्रमाणात घट झाली असून 5 रुपयांना एक या दराने लिंबू बाजारात विकले जात आहेत. शनिवारी पणजी मार्केटमध्ये भाजीपाला विपुल प्रमाणात उपलब्ध होता. गुढीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने ग्राहकांची वर्दळदेखील वाढली होती. बाजारात सध्या मानकुराद, हापूस, पायरी, तोतापुरी, सेंदुरी आंब्यांची विक्री सुरू झाली आहे. मात्र, आंब्यांचे दर चढेच आहेत. 3 हजार रुपयांपासून 700 रुपये डझनपर्यंतचे आंबे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रानमेवा देखील बाजारात दाखल झाला असून 50 रुपये एक माप असा दर आहे.

शहाळे, कलिंगडाने खाल्ला भाव

वाढत्या उन्हामुळे संत्री, मोसंबी, कलिंगड, शहाळे यासारख्या रसदार फळांना मागणी प्रचंड वाढली आहे. बाजारात खरेदीसाठी आलेले ग्राहक शहाळी, उसाचा रसाचा किंवा फळ रस घेताना दिसतात. 40 ते 50 रुपये प्रतिनग दराने शहाळे विकले जात असून कलिंगडालाही बाजारात मोठी मागणी आहे. 30 रुपये प्रतिकिलो दराने कलिंगडाची विक्री सुरू आहे.

दर प्रतिकिलो

कांदा ----------------------30

बटाटा ---------------------30

टोमॅटो ---------------------30

गवार ----------------------50

कोबी ---------------------40

गाजर ------------------70-80

बीन्स ------------------70-80

भेंडी-----------------------60

सीमला मिरची ---------------80

हिरवी मिरची --------120 ते 140

पालेभाजी प्रतिजुडी

मेथी ----------------------20

लाल भाजी -----------------10

कांदा पात ------------------20

मुळा ----------------------40

पालक ---------------------10

कोथिंबीर -------------------20

पुदिना ---------------------10

लिंबू ----------------5 रुपये एक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT