Pilgao Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: डिचोलीत रात्री खनिज वाहतूक सुरूच? पिळगाव ग्रामस्थांकडून पुरावे सादर; निर्देशांच्या पालनाचा 'वेदांताचा' दावा

Vedanta Mineral Truck Transport Dispute: रात्रीच्या या खनिज वाहतूक प्रकरणी रात्री उशिरापर्यंत डिचोली पोलिसात कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.

गोमन्तक डिजिटल टीम

Vedanta Mineral Transport Bicholim Pilgao

डिचोली: मनाई असतानाही डिचोलीत ‘वेदांता’कडून रात्रीची खनिज वाहतूक सुरूच आहे.न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून आजही (शुक्रवारी) रात्री उशिरापर्यंत खाणीवरून खनिज वाहतूक सुरू होती, असा आरोप पिळगावच्या नागरिकांनी केला असून, रात्रीची खनिज वाहतूक सुरू असतानाचे फोटो सादर केले आहेत.

मात्र, रात्री सुरू असलेली वाहतूक ही खनिज मालाची की ‘रिजेक्शन’ची ते मात्र समजू शकले नाही. न्यायालयाने मनाई केली असतानाही रात्रीच्यावेळी होणाऱ्या या वाहतुकीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. रात्रीच्या या खनिज वाहतूक प्रकरणी रात्री उशिरापर्यंत डिचोली पोलिसात कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.

रात्रीच्यावेळी खनिज वाहतूक करण्यात येत नाही, असा कंपनीचा दावा आहे, तर बंदी असतानाही डिचोलीतील खाणीवरून रात्रीच्यावेळी खनिज वाहतूक सुरू असल्याचे काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीवेळी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. रात्रीची खनिज वाहतूक बंद करून तसे हमीपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने वेदांता कंपनीला दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन; वेदांता

याविषयी वेदांता कंपनीने स्पष्टीकरणात म्हटले आहे की, वेदांता कंपनी खनिज वाहतुकीसंदर्भात आवश्यक ते नियम आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहे. खाण भाडेपट्ट्याच्या क्षेत्रामध्ये मालाची वाहतूक केली जात आहे आणि प्राधिकरणाने मंजूर केलेल्या निर्धारित वेळेच्या पलीकडे कोणत्याही धातूची वाहतूक केली जात नाही. कारण सर्व्हरमध्ये निश्चित केलेल्या वेळेपेक्षा कोणतीही ट्रिप केली जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT