Pond Dainik Gomantak
गोवा

Vedanta Mining: ..पुन्हा वेदांताचा गोंधळ! खाणपट्ट्यातील 13 तळी अहवालातून गायब; लवादाकडे याचिका दाखल

Vedanta EIA Report Dispute: पर्यावरण दाखला देताना या जनसुनावणीतील मुद्याचा उल्लेख केला गेला नाही. शिवाय पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालातही ही बाब दडवण्यात आली होती.

Sameer Panditrao

पणजी: ‘वेदांता’ कंपनीने (खाणपट्टा क्र. १) मधील १३ तळी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल करताना दडवल्याचा मुद्दा घेऊन त्या खाणपट्ट्याला दिलेल्या पर्यावरण दाखल्याला राष्ट्रीय हरित लवादात आव्हान दिले आहे. लवादाने याचिका दाखल करून घेतली असून २४ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.

डिचोली येथील निवृत्त शिक्षक आणि पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी ही याचिका सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जन सुनावणीवेळी त्यांनी खाणपट्ट्याने व्यापलेल्या डिचोली शहर, लामगाव, मुळगाव, शिरगाव या गावांपैकी एकट्या लामगाव व मुळगावमध्येच १३ तळी असल्याचा मुद्दा मांडला होता. पर्यावरण दाखला देताना या जनसुनावणीतील मुद्याचा उल्लेख केला गेला नाही. शिवाय पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालातही ही बाब दडवण्यात आली होती.

‘वेदान्ता’, ‘साळगावकर’ व ‘बांदेकर’ यांच्या खाणींच्या सीमा एकमेकांना जोडल्या जात असल्याने या खाण कामाचा पर्यावरणावर एकत्रित परिणाम मूल्यांकन होणे गरजेचे होते. ते केले गेले नसल्याचा मुद्दाही याचिकेत मांडला गेला आहे.

जनसुनावणी प्रकल्प स्थळी घेण्याचा नियम असतानाही या खाणपट्ट्याला पर्यावरण दाखला देण्यासंदर्भातील जनसुनावणी शिरगावहून १३ कि.मी., मुळगावहून १० कि.मी., तर लामगाव, मयेहून ७-८ कि.मी.वर घेण्यात आली असल्याकडेही लवादाचे लक्ष वेधले असल्याचे गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT