Goa Mines Dainik Gomantak
गोवा

Vedanta Mining Dispute: वेदान्‍ताच्‍या खाण खंदकाने उडवली झोप; मोठ्या प्रमाणात माती कोसळल्याची घटना

Bicholim Mine Dispute: या ठिकाणी उपाययोजना करण्यात न आल्यामुळे पिसुर्ले गावासाठी संकट निर्माण झाले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: डिचोली शहराला टेकून असलेल्या लामगावच्या माथ्यावरील सेसा (वेदान्ता)चे खाणखंदक आता असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. सध्या या खाणखंदकाच्या एकाबाजूने मोठ्या प्रमाणात माती कोसळली आहे.

तसेच मुसळधार पावसामुळे पिसुर्ले या ठिकाणी गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या खनिज खाणीच्या खंदकामध्ये तुडुंब पाण्याचा साठा झालेला आहे. परंतु या ठिकाणी उपाययोजना करण्यात न आल्यामुळे पिसुर्ले गावासाठी संकट निर्माण झाले आहे. सरकारने या दोन्ही खाण खंदकांकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.

दरम्यान, सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार व जलसिंचन खात्याने याकडे संयुक्तपणे उपाययोजना करण्यावर भर न दिल्यास यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.

सध्या पिसुर्ले गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचप्रमाणे गेल्या महिन्याप्रमाणे पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली, तर खाणखंदक कोसळून डिचोली शहरासह लामगाव आणि मुळगाव या गावांवर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही स्थानिक व्यक्त करीत आहेत. धोकादायक खाणखंदक त्वरित खाली करून सुरक्षेच्यादृष्टीने खाणींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सरकार खंदकांची जबाबदारी घेऊ इच्छित नाही. लोकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. कोडली व मुळगाव येथील खंदक पाण्याने तुडुंब भरले आहेत. सरकारने हे खाणपट्टे ताब्यात घेऊन तेथील सुरक्षेची जबाबदारी घ्‍यावी. जेव्हा आपत्तीची घटना घडेल तेव्हा सरकार व खाणपट्टे मालक एकमेकांवर जबाबदारी ढकलतील.
डॉ. क्लॉड आल्वारीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT