Vathadev Murder Case Dainik Gomantak
गोवा

वाठादेव येथे दारुच्या व्यसनातूनच पत्नीचा खून

संशयिताला कोठडी; वाठादेव येथील खुनाची पतीकडून कबुली

दैनिक गोमन्तक

डिचोली : वाठादेव येथील विवाहिता खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पतीने दारूच्या व्यसनातूनच विवाहितेचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाबाजूने धड काम नाही, त्यातच पतीला दारूचे व्यसन यामुळे पत्नीचे अधूनमधून पतीबरोबर खडके उडायचे. त्यातूनच बळीरामकुमार महातो याने गळा आवळून पत्नी शोभा देवी हिचा खून केल्याची कबुली दिली आहे.

संशयित महातो हा अधूनमधून दारुसाठी बायकोजवळ पैशांची मागणी करीत होता. खून झाला त्यादिवशी संशयिताने नवीन मोबाईल घेतला होता. त्यावरून त्या रात्री बायकोने वाद घातला. त्यातूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. शवचिकित्सा अहवालातही शोभा देवी हिचा गळा आवळल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले. संशयितला काल (बुधवारी) न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तर संशयिताबरोबर असलेल्या चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची ‘अपना घर’मध्ये रवानगी केली आहे.

वाठादेव-सर्वण येथे रोलिंग मिलपासून काही अंतरावर एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मूळ बिहार येथील ‘शोभा देवी’ या विवाहितेचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या शुक्रवारी उघडकीस आली होती. संशयित आणि मयत विवाहितेच्या नाव, गावाबद्दल कोणतीच माहिती नव्हती. तरीदेखील तपासाअंती मिळालेल्या धाग्यादोऱ्यावरून पोलिस संशयिताच्या मागावर होते.

बिहार येथे जाणाऱ्या रेल्वेत चढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. झांसी पोलिसांच्या मदतीने पोलिस उपनिरीक्षक अनिल पोलेकर, हवालदार विजय मांद्रेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल रणजीत बाले या पोलिस पथकाने बळीरामला ताब्यात घेतले आणि काल संध्याकाळी डिचोली पोलीस स्थानकावर आणले. पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

खुनाचा प्रकार उघडकीस आला, त्याच्या आदल्यादिवशी पहाटे संशयित बळीरामकुमार आपल्या चार वर्षीय चिमुकल्या मुलीला घेऊन खोलीबाहेर पडला होता. त्याच्यानंतर थिवी रेल्वे स्थानकावर मंगला एक्सप्रेस पकडून बिहारला पळून जाण्याचा त्याचा बेत होता. तपासाअंती ही माहिती समोर आली. पोलिसांचे एक खास पथक संशयिताच्या मागावर होते. त्याच्यासमवेत असलेल्या भावाच्या मोबाईल लोकेशनवरून झांसी-उत्तरप्रदेश येथील विरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT