Illegally Mountain Cutting : Dainik Gomantak
गोवा

Illegally Mountain Cutting : वाठादेवमध्ये डोंगरकापणी; बेकायदा प्रकरणामागे आर्थिक व्यवहार

Illegally Mountain Cutting : डिचोली, कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील डोंगरकापणी प्रकरणी पोलिसांतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला असून, या कृत्याची चौकशी सुरू झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegally Mountain Cutting : डिचोली, कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील डोंगरकापणी प्रकरणी पोलिसांतर्फे गुन्हा नोंद करण्यात आला असून, या कृत्याची चौकशी सुरू झाली आहे.

वाठादेव येथील रोलिंगमिल परिसरात (प्रभाग-११) बेकायदेशीरपणे डोंगरकापणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डिचोली येथील नगर उपनियोजन कार्यालयातर्फे डिचोली पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी नगर नियोजन कायद्यांतर्गत १७-अ या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणात एका पंचसदस्याच्या जवळच्या नातेवाईकाचा हात असल्याचा संशय आहे. रोलिंगमिल-वाठादेव परिसरातील सर्व्हे नंबर-११६/० या जमिनीत मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करण्यात आली आहे. या जमिनीत २२ भूखंडही पाडण्यात आले आहेत. हा सारा प्रकार बेकायदेशीर असल्याची पंचायतीची तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात (ता.२५ ) प्रशासकीय यंत्रणेने डोंगरकापणी केलेल्या परिसराची पाहणी केली होती. या संयुक्त पाहणीवेळी डिचोलीच्या संयुक्त मामलेदारांसह नगरनियोजन खात्याचे अधिकारी तसेच सरपंच दत्तप्रसाद खारकांडे आणि अन्य संबंधीत सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

डोंगरकापणी बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणीवेळी आढळून आले होते. संबंधीत जागेत चालू असलेली बेकायदा बांधकामे बंद ठेवण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT