Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: सामान्य जनतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य देणार; ओलेन्सियो सिमाईश

कोविड-19 (Covid-19) नियमाचे पालन करून सिमाईश आपला प्रचार प्रत्येक घरोघरी करीत आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: राज्य भाजप सरकार डबल इंजिनच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार वाढविला आहे. मध्यम वर्गीयाबरोबर गरीब जनतेला सत्ताधारी सरकारने महागाईच्या खाईत टाकलेले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) गोव्यात काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करून सामान्य जनतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन कुठ्ठाळी मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार (Congress Candidate) ओलेन्सियो सिमाईश यांनी केले.

कुठ्ठाळीचे गोवा प्रदेश काँग्रेसचे उमेदवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कासावली, वेलसांव, सांकवाळ, झुआरी नगर, बिर्ला, कुठ्ठाळी व इतर ठिकाणी घरोघरी प्रचार (Election Campaign) करण्यास सुरुवात केली. काँग्रेस उमेदवार सिमाईश यांना कुठ्ठाळी येथील विविध भागात वाढता प्रतिसाद लाभत आहे. कोविड-19 (Covid-19) नियमाचे पालन करून सिमाईश आपला प्रचार प्रत्येक घरोघरी करीत आहे.

याप्रसंगी बोलताना कोठ्ठाळीचे काँग्रेस उमेदवार सिमाईश म्हणाले की वाढत्या महागाईमुळे प्रत्येक जण आर्थिकरित्या कमजोर झाला असून, याला पूर्णपणे जबाबदार सत्ताधारी सरकारचे नेते असल्याचा आरोप सिमाईश यांनी केला. कुठ्ठाळी मतदार हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो पुन्हा मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास येथे रोजगार वाढविण्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम दर्जाचे करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT