Vasco Encroachment  Dainik Gomantak
गोवा

Vasco Encroachment : नवीन भाजी मंडईतील अतिक्रमणांवर वास्को पोलिसांची धडक कारवाई

वास्कोमध्ये वाढते अतिक्रमण नागरिकांची डोकेदुखी बनले आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco Encroachment : वास्कोमध्ये वाढते अतिक्रमण नागरिकांची डोकेदुखी बनले आहे. यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून शहरातील नवीन भाजी मंडईतील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारत वास्को पोलिसांनी शनिवारी लोकांच्या वाहतुकीला अडथळा ठरणारा रस्ता मोकळा केला.

शनिवारी महापालिका प्रशासनाला सुट्टी असल्याने विक्रेत्यांनी पॅसेजवर अतिक्रमण करून परिस्थितीचा फायदा घेतला. अतिक्रमण इतके होते की मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना मुख्य रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते,” असे वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

या प्रकरणाची तातडीने दखल घेत वास्को पोलिसांनी कारवाई करत सर्व अतिक्रमण हटवले. सुट्टीच्या काळातही ही मोहीम सुरूच राहील. मध्यस्थीदरम्यान पोलिसांना पालिका कामगारांनी मदत केली असल्याचे यावेळी नायक यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 2 मधील वेळूस वाळपई ठाणे रोड येथील मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेख दाऊद यांनी बेकायदेशीर रित्या बांधकाम केलेल्या इमारत वजा गाळ्यांचे आज वाळपई नगरपालिकातर्फे कारवाई करत जेसीपीच्या सहाय्याने बांधकाम पाडले आहे. वाळपईत अश्या प्रकारे पहिल्यांच बांधकाम पाडण्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT