Crime News  Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: वास्‍को खून प्रकरणात संशयिताला दणका! न्‍यायालयाकडून जामीन रद्द; कृत्‍य जाणूनबुजून केल्‍याचा ठपका

Vasco Crime News: वास्‍को खून प्रकरणातील संशयित अँथनी फर्नांडिस याने हे कृत्‍य जाणूनबुजून केल्‍याचे नमूद करून सत्र न्‍यायालयाने त्‍याचा जामीन रद्द केला. ही खुनाची घटना ६ ऑगस्‍ट २०२३ रोजी नवेवाडे-वास्‍को येथे झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Murder Case

मडगाव: वास्‍को खून प्रकरणातील संशयित अँथनी फर्नांडिस याने हे कृत्‍य जाणूनबुजून केल्‍याचे नमूद करून सत्र न्‍यायालयाने त्‍याचा जामीन रद्द केला. उद्या शुक्रवारी २५ ऑक्‍टोबर रोजी या संशयिताला त्‍याच्‍यावरील खुनाचा आरोप समजावून सांगितल्‍यानंतर उद्याच त्‍याच्‍यावर नव्‍याने भारतीय दंड संहितेच्‍या ३०२ (खून) कलमाखाली आरोप निश्‍चित केला जाणार आहे.

दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी हा निवाडा देताना संशयित अँथनी फर्नांडिस याचा जामीन रद्द केला.

दरम्‍यान, आरोप निश्‍चितीयावेळी संशयिताची बाजू मांडणारे वकील ॲड. सितीया परब यांनी ही हत्‍या जाणुनबूजून केलेला खुनाचा प्रकार नाही तर भांडण सुरू झाल्‍यावर अकस्‍मात झालेली प्रक्रिया असल्‍याचा दावा केला. तसेच संशयितावर ३०२ कलमाखाली आरोप निश्‍चित न करता ३०४ (२) सदोष मनुष्‍यवधाखाली आरोप निश्‍चित करावा असा युक्तिवाद केला. न्‍या. कवळेकर यांनी हा तो ग्राह्य मानताना संशयिताविरोधात ३०४ (२) कलमाखाली आरोप निश्‍चित केला होता.

मात्र सत्र न्‍यायालयाच्‍या आदेशाला मेहबूब शेख याचे वडील बुर‍हानसाब शेख यांनी उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. या न्‍यायालयाने ही घटना खुनाच्‍या प्रकारात मोडणारी असे नमूद करून हा खटला पुन्‍हा सत्र न्‍यायालयाकडे पाठविला होता. त्‍यानंतर न्‍या. कवळेकर यांनी संशयितावर खुनाच्‍या आरोपाखाली आरोप निश्‍चित करण्‍याचा निर्णय घेताना त्‍याला पूर्वी मंजूर केलेला जामीन रद्द केला. या प्रकरणात सरकारी वकील म्‍हणून ॲड. उत्‍कर्ष आवडे यांनी बाजू मांडली.

धारदार सुरा खुपसला होता पोटात

ही खुनाची घटना ६ ऑगस्‍ट २०२३ रोजी नवेवाडे-वास्‍को येथे झाली होती. संशयित अँथनी फर्नांडिस याचे मेहबूब शेख याच्‍याशी पूर्ववैमनस्‍य होते. त्‍यातूनच त्‍या दिवशी दुपारी साडेतीनच्‍या सुमारास त्‍या दोघांमध्‍ये बाचाबाची झाली. भांडण सुरू असतानाच संशयिताने आपल्‍या गाडीत असलेला सुरा बाहेर काढून मेहबूबच्‍या पोटात खुपसला. त्‍यात गंभीर दुखापत झाल्‍यने तो ठार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

गोव्यात सौंदर्य, पर्यावरण टिकवणाऱ्या उपक्रमांची अत्यंत आवश्यकता, स्थानिकांमुळेच राज्याच्या प्रेमात; कॅथरीना

Desmond Costa Goa Revolution: ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज... गोव्यातील तरुणांनी संघटना उभारावी

Goa Live Updates: 'ज्यांची बाजू खोटी असते तेच...'; कळसा-भांडूरा प्रकल्पप्रकरणी सुभाष शिरोडकरांचा हल्लाबोल

Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT