Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Vasco: माविन गुदिन्हो यांच्या हस्ते वास्कोत ‘ई’ बोध चिन्हाचे अनावरण

ज्येष्ठ वृद्ध चालकांचा आदर राखा, धीर धरा' अशा ‘ई’ बोध चिन्हाचे अनावरण वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Vasco: ‘ज्येष्ठ वृद्ध चालकांचा आदर राखा, धीर धरा' अशा ‘ई’ बोध चिन्हाचे अनावरण वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. रोटरी क्लब ऑफ मिरामार यांच्या पुढाकाराने राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यातील ज्येष्ठ वाहन चालकांसाठी ‘ई’ बोध चिन्ह तयार केले आहे.

वृद्ध चालकांचा आदर व सन्मान राखण्याकरिता इतर वाहनचालकांनी ‘ई’ बोध चिन्ह असलेल्या वाहनांचा आदर राखण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले.

नवेवाडे-दाबोळी येथील भाजप कार्यालयात वाहन चालवणाऱ्या वृद्ध चालकांसाठी ‘ई’ बोध चिन्हाचे अनावरण मंत्री गुदिन्हो यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरामारच्या अध्यक्षा प्रीती शेट, लकी सिंग, भावना रायकर, श्रेयस लोटलीकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद व इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

राज्यातील ‘विन्टेज’ वाहनांना नवीन क्रमांक देण्याचा राज्य वाहतूक विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे पूर्वीच्या वाहनांना रस्त्यावर धावण्यास पुन्हा संधी मिळेल. तसेच विन्टेज वाहनामुळे पर्यटन क्षेत्रालाही बऱ्यापैकी लाभ होईल. अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

राज्यात वाहन चालवणाऱ्या वृद्ध चालकांनी आपल्या वाहनावर ‘ई’ बोधचिन्ह लावावे. यामुळे मागून येणारे वाहनचालक आपला अवश्य आदर राखतील. रोटरी क्लब ऑफ मिरामार यांनी वृद्ध चालकांचा खऱ्या अर्थाने आदर राखला असून ते अभिनंदनास पात्र आहेत. - माविन गुदिन्हो, वाहतूक मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT