Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

Vasco Khariwada Jetty: परप्रांतीय खलाशी कामगार आपापल्‍या गावांतून अजून परतले नसल्‍याने येथील खारीवाडा मच्‍छीमारी जेटीवर तशी सामसूमच आहे.

Sameer Amunekar

वास्को : परप्रांतीय खलाशी कामगार आपापल्‍या गावांतून अजून परतले नसल्‍याने येथील खारीवाडा मच्‍छीमारी जेटीवर तशी सामसूमच आहे. अजून ७५ टक्के ट्रॉलर्स तेथेच नांगरून ठेवण्‍यात आलेले आहेत.

मासेमारीचा हंगाम १ ऑगस्‍टपासून सुरू झाला आहे. मात्र खारीवाडा मच्‍छीमारी जेटीवर ट्रॉलर्समालक, कामगारांची लगबग अजून दिसून येत नाही. पहिल्या दिवशी काही बोटी मासेमारीला गेल्या होत्या. त्‍यांना बऱ्यापैकी मासळी मिळाली. विशेष म्‍हणजे या जेटीची दुरुस्ती करण्याची गरज होती. परंतु ती मोसमापूर्वी झाली नाही.

त्यामुळे ट्रॉलर्समालकांना अनेक समस्‍यांचा सामना करावा लागतोय. काही ट्रॉलर्सचे नुकसानही झाले आहे. त्यांच्‍या दुरुस्तीसाठी पदरमोड करावी लागते, असे माजी मंत्री व गोवा फिशिंग बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले.

ट्रॉलर्सवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जेटीवर सुलभ शौचालय व इतर सुविधा पुरविण्‍याची आश्‍‍वासने अनेक वेळा देण्‍यात आली, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे डिसोझा यांनी सांगितले.

कामगार गावांहून अद्याप परतले नसल्याने तसेच बोटींच्‍या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने सुमारे ७५ टक्के बोटी मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत. तसेच खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीकडे सरकारने म्हणावे तसे लक्ष न दिल्याने बोटमालकांना अनेक समस्‍या सतावत आहेत. जेटीवर सुलभ शौचालये बांधण्याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले होते, परंतु त्‍याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. - जुझे फिलिप डिसोझा, माजी मंत्री तथा गोवा फिशिंग बोटमालक संघटनेचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT