Vasco Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

Vasco News : तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय काढण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, मुरगाव काटे बायणा समुद्र किनाऱ्यावरील बायणा रापणकार मच्छीमार कॅनॉय मालक संस्थेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल.

तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय काढण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

दाबोळी येथे झालेल्या भाजपच्या प्रचार सभेवेळी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना निवेदन सादर करून बायणा समुद्र किनाऱ्यावरील समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी, गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील रापणकारांना सरकारमार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. रापणकारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री स्व. माथानी साल्ढाना सदैव पुढाकार घेत होते.

भाजप सरकारात असताना साल्ढाना रापणकारांच्या समस्या मंत्रिमंडळात सातत्याने मांडायचे. त्यांच्या सारख्या नेत्याची आज अत्यंत गरज आहे. बायणातील रापणकारांना सरकार अवश्य मदत करणार आहे. काही तांत्रिक समस्या आल्यास सरकार रापणकारांचा सल्ला घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, लवकरच काटे बायणा समुद्र किनारी रापणकारांना छोट्या मासळी पकडणाऱ्या बोटी लावण्यासाठी जेटी उभारण्यात येणार आहे. याविषयी सर्व कागदपत्रे तयार झाली असून लवकरच पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रसंगी दक्षिण गोवा भाजप

उमेदवार पल्लवी धेंपे, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर उपस्थितीत होते.

टॅक्सी व्यावसायिकांना सर्वतोपरी मदत

दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमॅन संघटना व मुरगाव हार्बर येथील पर्यटन जहाजावरील पर्यटकांना सेवा देणारी मुरगावचा राजा टॅक्सी संघटनेनेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना निवेदन सादर केले. युनायटेड टॅक्सीमॅन (पिवळे -काळी) संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र मयेकर, इतर पदाधिकारी व टॅक्सी चालक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाबोळी विमानतळ कधीच बंद पडणार नाही. दाबोळी विमानतळाचा आणखीन विस्तार होत असताना बंद पडणार ही फक्त विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. या विमानतळावरून एक चार्टर्ड विमान गेले म्हणून घाबरण्याची कोणतीच गरज नाही. लवकरच आणखीन विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मुरगावचा राजा टॅक्सी संघटनेला मदत केली जाईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT