Vasco Damodar Saptah Dainik Gomantak
गोवा

Vasco Damodar Saptah : दामोदर भजनी सप्‍ताहाची सांगता

सप्ताह काळात भरलेली फेरी 8 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco Damodar Saptah : 24 तास चाललेल्या येथील श्री दामोदर भजनी सप्ताहाची सांगता आज गुरुवारी दुपारी खारीवाडा येथे अरबी समुद्रात श्रीफळ विसर्जन आणि नंतर गोपाळकालाने झाली. मंदिराकडून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. दरम्‍यान, सप्ताह काळात भरलेली फेरी 8 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

वास्कोचे ग्रामदैवत श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून बुधवारी दुपारी 12.30 वाजता 123व्या भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला होता. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा उत्‍सव एकदम साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍यात आला होता. मात्र यंदा महामारी कमी झाल्‍यानंतर भाविकांचा उत्‍साह शिगेला पोचला. गोव्‍यासह शेजारील राज्‍यांतील भाविकांनीही सप्ताहास हजेरी लावून श्री देव दामोदरचे दर्शन घेतले.

सप्ताहानिमित्त उत्सव बाजारकर समितीतर्फे पार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस वसाहतीजवळ रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत गोव्यातील नामवंत कलाकारांच्या भजनाच्या मैफिली रंगल्‍या. तसेच प्रसिद्ध गायक कलाकार ऋषिकेश बडवे यांच्या गायनाने त्‍यात आणखी रंगत आणली. या बैठकीनंतर पार मंदिरात पहाटे 5 वाजता पोहोचला. यावेळी मंदिरात भजनाच्या मैफली सुरू होत्या.

दरवर्षी वास्कोतील विविध समाजाचे पार (चित्ररथ) दिंडीसह दामोदर मंदिरात येतात. मात्र यंदा सर्व पार दिंडींना फाटा देण्‍यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT