Vasco Da Gama City Name Change Sambhaji Dainik Gomantak
गोवा

Vasco: 'वास्को द गामा' नव्हे 'संभाजी'; 1970 मध्येच बदलले होते शहराचे नाव, वेलिंगकरांनी दिला पुरावा

वास्को'चे नाव 'संभाजी नगर' करावे अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीने केली आहे.

Rajat Sawant

Vasco Da Gama City Name Change Sambhaji: "वास्कोचे नाव 1970 सालीच संभाजी करण्यात आले होते. मधल्या काळात कुणीतरी लोकभावनेशी दगा करून हा आदेश अव्हेरण्याचे कारस्थान केलेले आहे."

"भाजप सरकारने वास्कोचे नाव संभाजी करावे व स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करावे" अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

याबाबतचा पूरावा म्हणून महसूल विभागाचे तत्कालिन सेक्रेटरी डाॅ.जे.सी.आल्मैदा यांनी काढलेले 1970 सालचे आदेशपत्र जारी केले आहे.

वेलिंगकर यांनी प्रसिध्दिपत्रकात असे नमूद केले आहे की, "गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब यांच्या कारकिर्दीतच गोव्याची सर्वात मोठी लोकसंख्या असलेले वास्को शहराचे नाव राष्ट्रीय दृष्टिकोनातून बदलून "संभाजी" असे ठेवले होते. याबाबत महसूल विभागाचे तत्कालिन सेक्रेटरी डाॅ.जे.सी.आल्मैदा यांनी आदेशपत्र काढले होते."

"भाजप सरकारने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करीत मुक्त गोव्याची वास्को द गामा या दरोडेखोराच्या नावामुळे लागलेल्या कलंकांतून मुक्तता करावी."

"स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करून स्व. भाऊंच्या 50व्या पुण्यतिथीच्या वर्षात त्यांना अनुरुप श्रद्धांजली द्यावी, अशी समस्त गोवेकरांची अपेक्षा भाजपा सरकारने पूर्ण करावी," अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीने केली आहे.

1970 Revenue Department Notification

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT